Viral Video: लाल रंगाच्या किंग कोब्राचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल; खरा व बनावट, जाणून घ्या सत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: लाल रंगाच्या किंग कोब्राचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल; खरा व बनावट, जाणून घ्या सत्य

Viral Video: लाल रंगाच्या किंग कोब्राचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल; खरा व बनावट, जाणून घ्या सत्य

Mar 20, 2024 07:36 PM IST

Red Cobra Video : हा दुर्मिळ साप मुख्यरित्या आफ्रिकेत आढळला जातो. मिस्र, तांझानिया, युगांडा आणि सूडान आदि देशात हा साप आढळतो.

व्हायरल होत असलेला लाल रंगाचा किंग कोब्रा सापाचा व्हिडिओ
व्हायरल होत असलेला लाल रंगाचा किंग कोब्रा सापाचा व्हिडिओ

जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. त्यापैकी काही खूपच खतरनाक तर काही आकर्षक तसेच विषारी नसतात. सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात आकर्षक आणि जगभरात प्रसिद्ध कोब्रा मानला जातो. त्यातच आता एका लाल रंगाच्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा साप किंग कोब्रा असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

काही लोक या अनोख्या साप खरा की खोटा याचा अंदाज लावू शकलेले नाहीत. व्हायरल व्हिडिओवर याच मुद्द्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, सापाला लाल रंगात ठेवले आहे. पण हे सत्य आहे? जाणून घेऊन संपूर्ण प्रकरण..

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक माणूस लाल रंगाचा साप पकडताना दिसत आहे. त्यावेळी हा साप आपला फना काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा साप दिसायला बिल्कूल किंग कोब्राप्रमाण आहे. मात्र लाल रंगाचा कोब्रा असणे, लोकांना संभ्रमात टाकणारे आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर जवळपास १७ हजार लोकांनी लाइक्स केले आहे. हे खरे की बनावट यावर लोकांची चर्चा होत आहे. मात्र सर्वांना संशय येत असताना एका व्यक्तीने मानले की, इतक्या चमकदार रंगाचा कोब्रा खूपच कमी प्रमाणात दिसून येतो.

खरंच लाल रंगाचा कोब्रा असतो?
जगात रेड स्पिटिंग कोब्रा नावाचा एक खरा साप आढळून येतो. हा व्हिडिओ खरा आहे की नाही माहिती नाही, मात्र लाल रंगाचा कोब्रा असतो. ए-झेड एनिमल्सने दिलेल्या माहितीनुसार हा दुर्मिळ साप मुख्यरित्या आफ्रिकेत आढळला जातो. मिस्र, तांझानिया, युगांडा आणि सूडान आदि देशात हा साप आढळतो. याचे वैज्ञानिक नाव आहे नाजा पल्लिडा. याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा साप विष थुंकत असतो.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर