मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठी ट्रेनमध्येच पेटवली शेकोटी, व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठी ट्रेनमध्येच पेटवली शेकोटी, व्हिडिओ व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 19, 2024 05:27 PM IST

Sangam Express Train Bonfire Video: धावत्या ट्रेनमध्ये शेकोटी पेटवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Viral Video
Viral Video

Train Bonfire Viral Video: कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे लोक विविध पद्धतींचा अवलंब करत आहेत. दरम्यान, थंडीपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने चक्क चालत्या ट्रेनमध्ये शेकोटी पेटवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ मेरठहून प्रयागराजला जाणाऱ्या संगम एक्सप्रेसमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण धावत्या रेल्वेमध्ये शेकोटी पेटवून हात त्यांचे हात शेकताना दिसत आहे. त्यांना पाहून दुसरी व्यक्ती त्यांच्याजवळ येते. परंतु, ती व्यक्ती त्यांची समजूत घालण्याऐवजी स्वत:ही पाय शेकवू लागतात. मात्र, काही वेळाने रेल्वेच्या डबात धुर पसरल्याने इतर प्रवाशांनी रेल्वेत आग लागल्याची भिती व्यक्त केली. आगीची खात्री करण्यासाठी जीआरपीचे पथक रेल्वेपर्यंत पोहोचले. त्यावेळी त्यांना प्रकार समजला.

@Benarasiyaa नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आग पेटवलेल्या संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

WhatsApp channel

विभाग