विना लायटर, माचिस किंवा अन्य ज्वलनशील पदार्थांचा वापर न करता एका मुलाने गॅस शेगडी अशा प्रकार पेटवली की, त्याचे टॅलेंट इंटरनेवट व्हायरल झाले आहे. दरम्यान व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणत आहेत की, यात काहीतरी ट्रीक असेल, तर काही लोक म्हणत आहेत की, मुलामध्ये अजब ठिणगी आहे. दरम्यान काही युजर्स यामागचे विज्ञान समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.
या व्हायरल व्हिडिओत दिसते की, एक मुलगा खुर्चीवर मांडी घालून बसला आहे. त्याच्या जवळच गॅस शेगडी आहे. मुलाचे आपल्या हाताचे बोट गॅस शेगडीच्या जवळ ठेवले आहे. गॅसचे कॉक ऑन आहे. तेव्हा दुसरा मुलगा येतो व खुर्चीवर बसलेल्या मुलाच्या डोक्यावर चादर टाकून तो झटक्यात ओढून घेतो. मात्र यामुळे गॅस तत्काळ पेट घेतो. यामागे काय विज्ञान आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र लोक हे घातक व धोकादायक असल्याचे म्हणत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ पाहून लोक घरातही असा प्रयोग करू शकतात.
आता या मुलाचा कारनामा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @Madan_Chikna नावाच्या X यूजरने ११ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, - मुलाने स्टॅटिक एनर्जी निर्माण करून गॅस शेगडी पेटवली. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान काही यूजर याला बोटांची करामत म्हणत आहेत, तर काही लोक म्हणत आहेत की, असे व्हिडिओ पोस्ट करू नका, यामुळे अन्य लोक असा प्रयोग करू शकतात.