Viral News: बेंगळुरूच्या शंकर नगर भागात एका महिलेची मंदिराच्या खिडकीबाहेरून सोन्याची चेन हिसकावण्यात आली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी गणेश मंदिरात घडली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून महिलांना अशा चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. या घटनेने मंदिरात येणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निळ्या रंगाची साडी परिधान केलेली वृद्ध महिला खिडकीजवळ बसलेली आहे. तर, महिला प्रार्थना करताना दिसत आहेत. तितक्यात खिडकीबाहेरून आलेल्या एका व्यक्तीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून गेला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चोरी झालेली सोन साखळी ३० ग्रॅम वजनाची आहे.घेतली. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
सव्वातीन लाख रुपये किमतीचे महागडे इलेक्ट्रॉनिक्स आणि परकीय चलन असलेली व्हिएतनामी पर्यटकाची बॅग लोकलमधून चोरणाऱ्या चोरट्याला दादरच्या जीआरपीपोलिसांनी अटक केली आहे. यव्हिएतनामी पर्यटक ट्रॉन डक (वय, ३४) यांनी दादर येथे उतरताना आपली बॅग जनशताब्दी ट्रेनमध्ये हरवल्याची तक्रार जीआरपीकडे केली.
दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डक गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोचली. परंतु, त्यांची बॅग डब्यात नव्हती. अर्ध्या तासानंतर डकला एका विचित्र व्यक्तीचा फोन आला की त्याला डकचा पासपोर्ट आणि व्हिसा सापडला आहे. परंतु, बॅगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा रोख रकमेबद्दल काहीही माहित नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर वेगळाच संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्हेची कबूली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी नवल प्रेमकुमार अग्रवाल (वय, ४०) बॅगसह सीएसएमटी येथे गाडीतून उतरल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याचा सीएसएमटी येथील एका हॉटेलमध्ये शोध घेतला असता अग्रवाल हा प्रत्यक्षात संभाजीनगरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. संभाजीनगर येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांनी शोध घेतला असता चोरीच्या साहित्यासह बॅग सापडली. शनिवारी व्हिएतनामला परतण्यापूर्वी पोलिसांनी डकची बॅग त्याला परत केली. अग्रवाल यांना नोटीस पाठवली असून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या