Viral Video: जिथे डिलिव्हरी करण्यासाठी गेला, तिथेच केली चोरी; डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल-viral video swiggy delivery boy gets soaked in rain netizens show empathy ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: जिथे डिलिव्हरी करण्यासाठी गेला, तिथेच केली चोरी; डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: जिथे डिलिव्हरी करण्यासाठी गेला, तिथेच केली चोरी; डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

Sep 17, 2024 08:24 PM IST

Delivery Boy Viral Video: डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयने चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल
स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

Swiggy Delivery Boy Viral Video: चोरीशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. पण राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. प्रत्यक्षात एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकांच्या येथे डिलिव्हरी करण्यासाठी गेला असता तिथे चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोएडा सेक्टर ७३ मध्ये ही घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या १९ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये फ्लॅटच्या बाहेरील पायऱ्यांजवळ काही शूज ठेवलेले दिसत आहेत. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय जिन्यावरून खाली येतो. त्याने हेल्मेट घातले आहे. डिलिव्हरी बॉय तिथे ठेवलेल्या शूजकडे बघतो आणि त्यातील एक उचलून बॅगेत ठेवतो. बॅग बंद करून तो पायऱ्यांवरून खाली उतरतो. व्हायरल होत असलेल्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा डिलिव्हरी बॉय स्विगी कंपनीचा असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्याने स्विगीचा टी-शर्ट घातला आहे. मात्र, चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येईल.  

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. नॉलेज रूम नावाच्या युजरने एक्सवर लिहिले आहे की, 'असे लोक गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्याकडे चांगले शूज नाहीत, हे माझ्या लक्षात आले आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. अकीलने लिहिले की, 'ही चोरी आहे की मजबूरी हे मला माहित नाही. अभिषेक रावने लिहिले की, 'ही चोरी नाही, तर मजबूरी आहे. शशांकने लिहिले की, 'मजबूरीअसेल पण तसे करणे चुकीचे आहे. जुबेरने लिहिले की, 'चोरी करण्याची मजबूरी होऊ शकत नाही. गरिबीचा अपमान कशासाठी? पवनने लिहिले की, 'पोलिसांकडे तक्रार करावी. आज तो शूज चोरतोय, उद्या तो काहीतरी वेगळेकरेल. व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

याआधी एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, या व्हिडिओ डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी ऑर्डर दिलेले जेवण खात असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच संबंधित डिलिव्हरी बॉयविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.

 

 

 

Whats_app_banner
विभाग