भारतातील अनेक गरीब मजूर-कामगार एखाद्या फिल्मी हिरोच्या अंदाजात वावरत असतात. मात्र खूपच कमी लोक खऱ्या आयुष्यात हिरो सारखे साहस दाखवून कौतुकास पात्र ठरत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण भारतातील या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती मजुरासारखा दिसत आहे. या व्यक्तीने भल्या मोठ्या सापाला कंबरेला गुंडाळून त्याचा बेल्ड बनवला आहे. सापाशी खेळत त्याचे तोंड हातात घेत त्यांच्या डसण्याची पर्वा न करता सिगरेट ओढत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये प्रौढ दिसणारा हा व्यक्ती हमालाचा यूनिफॉर्म असलेला निळा शर्ट व पँट परिधान केलेला आहे. त्याने साप कंबरेला गुंडाळून त्याचा बेल्ट म्हणून वापर केला आहे. हा साप विषारी जातीचा किंग कोब्रा दिसत आहे. मात्र याची पुष्टि झालेली नाही. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सापाबाबत कोणतीही भीती दिसत नाही. तो मजेत त्याच्याशी खेळत आहे. यावेळी रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक त्याच्या कारनाम्याकडे पाहात आहेत. रस्त्यावरून अनेक वाहनेही जात आहेत.
हा व्यक्ती खुपच आरामात व बेजबाबदारपणे सापाला पकडतो. सापाचे तोंड हातात घेऊन तो खूप वेळ उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसते की, हा व्यक्ती एका हाताने सापाचे तोंड पकडतो तर दुसऱ्या हाताने सापाची शेपटी पकडून त्याला मागे ओढताना दिसतो.
इंस्टाग्रामवर yaswanth._ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यशवंत रेड्डी नागीरेड्डी असे शेअर करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २.५ मिलियन म्हणजेच २१५ लाख लोकांनी पाहिला आहे. लोकांनी या व्यक्तीची तुलना तेलुगु स्टार नागार्जुनच्या चित्रपटातील मास नावाच्या भूमिकेशी केली आहे.
अनेकांनी या व्यक्तीला खूपच टेलेंटेड म्हटले आहे, काहीनी याला सुपरमॅनही संबोधले आहे. एका यूजरने सुपरस्टार रजनीकांतचा फोटो लावून याचे खूप कौतुक केले आहे. तर एकाने याला पॉवर ऑफ वाइन म्हणत संकेत दिला आहे की, हा व्यक्ती नशेत असू शकतो. त्यामुळे तो काय करतोय याचे त्यालाच समजत नसावे.
संबंधित बातम्या