Cooking Paratha on CPU: गॅस, स्टोव्हऐवजी सीपीयूवर बनवला आलू पराठा; व्हिडिओ व्हायरल-viral video shows man cooking mini aloo paratha on cpu swiggy drops a comment ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cooking Paratha on CPU: गॅस, स्टोव्हऐवजी सीपीयूवर बनवला आलू पराठा; व्हिडिओ व्हायरल

Cooking Paratha on CPU: गॅस, स्टोव्हऐवजी सीपीयूवर बनवला आलू पराठा; व्हिडिओ व्हायरल

Mar 11, 2024 04:36 PM IST

Swiggy Comment Cooking Paratha On CPU: सीपीयूमध्ये मिनी आलू पराठा शिजवणाऱ्या व्हायरल व्हिडिओवर स्विगी इंडियाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Man cooking mini aloo paratha on CPU.
Man cooking mini aloo paratha on CPU. (Instagram/@lets_tech_official)

Cooking Paratha on CPU: सोशल मीडियावर आपल्याला दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर मिनी आलू पराठा बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा आलू पराठा गॅस किंवा स्टोव्हऐवजी सीपीयूवर बनवण्यात आला आहे. सीपीयूमध्ये मिनी आलू पराठा शिजवणाऱ्या व्हायरल व्हिडिओवर स्विगी इंडियाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

@lets_tech_official इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आलू पराठ्यासाठी पीठ मळतो. त्यानंतर त्यात बटाटा भरून सीपीयूवर ठेवतो आणि काही वेळाने पराठा तयार होतो.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्विगी इंडियाने यावर कमेंट केली आहे. “आईच्या हाताचे जेवण (नाहीचे चिन्ह) मदरबोर्डवर बनवलेले अन्न (हो असे चिन्ह).” त्यानंतर या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला. एका व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, "जेव्हा तुम्हाला शेफ व्हायचे असते आणि तुमचे कुटुंब तुम्हाला इंजिनियर बनण्यास भाग पाडते तेव्हा असे होते." दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, “सीपीयू हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट नाही. हे पराठे शिजवण्याचे भांडे आहे.” तिसऱ्याने व्यक्तीच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले “मी भात बनवण्यासाठी I9 विकत घेणार आहे”, असे त्याने म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग