Viral Video: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात, पुजाऱ्यांचे संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात, पुजाऱ्यांचे संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद

Viral Video: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात, पुजाऱ्यांचे संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद

Published Sep 28, 2024 05:05 PM IST

Bengaluru Temple Viral Video: मंदिरातील देणगीचे पैसे खिशात घालणाऱ्या पुजाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल व्हिडिओ: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात
व्हायरल व्हिडिओ: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात (X)

Bengaluru temple Donation Theft: बंगळुरूच्या बायतारायणपुरा येथील गल्ली अंजनेय स्वामी मंदिरात पुजाऱ्यांनी देणगीच्या पैशांची चोरी केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका व्यक्तीने दुसऱ्याला रोख रक्कमेचे बंडल दिले. यानंतर मंदिरातील पुजारी भाविकांच्या पैशांची चोरी करत असल्याची चर्चा सुरू झाली.

@IyengarShashank या ट्विटर हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'यामुळे सरकारने मंदिरांवर प्रशासकीय जबाबदारी सोपवली पाहिजे. बंगळुरूच्या गल्ली अंजनेय स्वामी मंदिरात प्रशासकीय कर्मचारी पैसे खिशात घालताना दिसत आहेत. तर, काही वेळा अन्य एक व्यक्ती दुसऱ्या माणसाच्या हातात नोटांचा बंडल देताना दिसत आहे.  हे लज्जास्पद आहे.'

दरम्यान, हा व्हिडिओ काल म्हणजेच २७ सप्टेंबर २०२४ रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर,  १० हजार लोकांनी लाइक्स केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. तसेच या प्रकरणातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने असे म्हटले आहे की, हा पुजाऱ्यांचा हातखंडा आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, हे अत्यंत लज्जास्पद असून मंदिरात पुजारांच्या रुपात चोर दिसत आहे. अशा लोकांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होते. त्यांना काढून टाका, त्यांची लाज वाटते. 

मंदिरातील चोरीचा व्हिडिओ जुना असल्याचा दावा

या घटनेनंतर मंदिराचे मुख्य पुजारी रामचंद्र यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही घटना वर्षभरापूर्वीची असल्याचे सांगितले. त्यावेळी मंदिर प्रशासनाने तत्परतेने कारवाई केली, असे त्यांनी बंगळुरू मिररला सांगितले. परिणामी, या गैरव्यवहारप्रकरणी कार्यकारिणीतील दोन सदस्यांना निलंबित करण्यात आले. तसेच दोन स्वयंपाकींनाही कामावरून काढून टाकण्यात आले

नाशिक: महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरले

याआधी नाशिकच्या मनमाडमधील स्वामी विवेकानंद नगरमध्ये भोलेश्वर महादेव मंदिरात चोरी झाली केल्याची घटना घडली होती. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातले पैसे लंपास करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. तर त्याच भागातील गणेश नगर महाकाल मंदिरातील स्पीकरही चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर