Saudi Robot Viral Video: सौदी अरेबियाने आपला पहिला ह्यूमॅनॉईड रोबोट तयार केला आहे. या रोबोटला पाहण्यासाठी जगभरातील लोक सौदी अरेबियाला जात आहेत. मात्र, हा रोबोट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या रोबोटने एका महिला पत्रकारला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला, ज्याचा व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या रोबोला मुहम्मद असे नाव देण्यात आले आहे. लॉन्च होताच या रोबोटने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोबोट एका महिला पत्रकाराला आक्षेपार्ह स्पर्श केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही घटना ४ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. लॉन्चिंगनंतर एक महिला पत्रकार या रोबोटच्या बाजूला उभा राहून रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
रोबोटने महिला पत्रकारला कशामुळे आणि कसे स्पर्श केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या रोबोटमध्ये तांत्रिक बिघाड झाला की रोबोट हाताळणाऱ्या व्यक्तीने काही गैरकृत्य केले आहे का? याबाबत सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने म्हटले आहे की, हा रोबोट कोणत्या उद्देशाने बनवला आहे? दुसऱ्याने म्हटले आहे की, रोबोटने असे का केले? याची खरोखर चौकशी व्हायला हवी? हा रोबोट महिला पत्रकाराला अशा पद्धतीने स्पर्श करू शकतो? असाही एकाने प्रश्न उपस्थित केला.
संबंधित बातम्या