Modi & US: प्रसिद्ध कलाकार देवी श्री प्रसाद, हनुमानकाइंड आणि आदित्य गढवी यांनी न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे १३,५०० हून अधिक लोकांच्यासमोर परफॉर्मंस केल्याने 'मोदी अँड यूएस' शो अविस्मरणीय ठरला. आदित्य गढवीने आपल्या 'खलासी' या सुपरहिट गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. असा दमदार परफॉर्मंस पाहून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भरावून गेले आणि त्यांनी कलाकारांची गळाभेट घेतली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नासाऊ कोलिझियम येथे पोहोचले, जिथे त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. 'मोदी अँड यूएस' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ही एक ऐतिहासिक ठरले, जे न्यूयॉर्कच्या लाँग आयलँडमधील नासाऊ कोलिझियम येथे झाले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ४२ वेगवेगळ्या राज्यांमधून भारतीय समुदायाचे १५,००० लोक एकत्र आले.
पंतप्रधानांच्या आगमनानंतर मोठ्या कार्यक्रमासाठी पारंपरिक संगीत सादर करण्यासाठी विविध गटांचे कलाकार अनेक दिवसांपासून तयारी करत होते. कर्नाटकच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि केरळच्या काही भागात लोकप्रिय असलेला पारंपरिक लोकनृत्याचा 'यक्षगान' हा प्रकार कलाकारांनी या ठिकाणी सादर केला. तामिळनाडूतील भारतीय वंशाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी आयोजित कार्यक्रमात पारंपारिक वाद्य 'पराई' वाजवले.
न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड मधील नासाऊ कोलिझियमच्या बाहेर, महाराष्ट्रात उगम पावलेला एक कलाविष्कार रविवारी एक गट मल्लखांब सादर करताना दिसला. मल्लखांब फेडरेशन यूएसचे जयदेव अनाटा म्हणाले की, 'ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळावा या उद्देशाने आम्ही अमेरिकेतील मल्लखांबला कलाबाजी आणि जिम्नॅस्टिक खेळ म्हणून प्रोत्साहन देत आहोत. हे जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक संधीचा वापर करत आहोत.
पंतप्रधान मोदी २३ सप्टेंबर रोजी भविष्यातील शिखर परिषदेला संबोधित करण्याव्यतिरिक्त न्यूयॉर्कमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकांचे अध्यक्षपद भूषवतील आणि सीईओ गोलमेज परिषदेला उपस्थित राहतील.