Viral News: समुद्रात अचानक वादळ आल्याने भलेमोठे क्रुझ जहाज रॉयल कॅरिबियन क्रूझ जहाज चक्क ४५ अंशांनी अटलांटिक महासागरात झुकले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अचानक जहाज पाण्यात झुकल्याने क्रूझ जहाजातील प्रवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागले. या घटनेत क्रुझ जहाजातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
क्रूझ हायव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ नोव्हेंबर २०२४ रोजी रॉयल कॅरेबियनच्या एक्सप्लोरर ऑफ द सीजमध्ये घडली. चक्रीवादळाच्या जोरावर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे १ लाख ३७ हजार ३०८ टन वजनाचे आहे. परंतु, समुद्रात अचानक आलेल्या वादळामुळे जहाजाला तडाखा बसला आणि त्यानंतर जहाज एका बाजुला झुकले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत प्रवासी जीव धरुन इकडे- तिकडे धावत आहेत. प्रवाशांना सरळ उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. याशिवाय, जहाजामधील अनेक वस्तू एका बाजुने दुसऱ्या बाजूला सरकरताना दिसत आहेत. क्रू मेंबर्स घाबरलेल्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओत जहाजावरील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज क्रु मेंबर्स जवळपास ५ हजार लोक प्रवाशांना घेऊन प्रवास करत असताना ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, काही प्रवासी आणि क्रू मेंबर्सला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या घटनेनंतर क्रू मेंबर्संनी प्रवाशांना पुन्हा एकदा आपल्या खोलीत जाण्यास सांगितले, ज्यामुळे जहाजातून किती लोक प्रवास करत आहेत आणि सध्या किती प्रवासी उपस्थित आहेत.
हा व्हिडिओ १० नोव्हेंबर २०२४ रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ३० दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या घटनेनंतर प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'मी देखील याच जहाजात होतो. त्यावेळी डायनिंग रुममधील परिस्थिती भयानक होती. सगळ्या प्लेट्स फुटल्या होत्या आणि जेवण सगळीकडे पसरले होते. लोक आरडोओरडा करत आहेत.'