मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वर्दळीच्या रस्त्यावर प्रवाशानं कारचा दरवाजा उघडला, पाठून येत होती रिक्षा; नंतर ते जे घडलं ते भयंकर

वर्दळीच्या रस्त्यावर प्रवाशानं कारचा दरवाजा उघडला, पाठून येत होती रिक्षा; नंतर ते जे घडलं ते भयंकर

Feb 10, 2024 06:59 AM IST

Car and Auto rickshaw Accident: कार आणि ऑटो रिक्षात यांच्यात घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिायवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

The image shows an auto-rickshaw that rammed into a car's door.
The image shows an auto-rickshaw that rammed into a car's door. (X/@3rdEyeDude)

Viral Video: वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध एक धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने अचानक एका कारचा दरवाजा उघडला, ज्यामुळे पाठून येणारी एक रिक्षा कारला धडकली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. कॅबमधील प्रवाशाने रस्त्याच्या मधोमध कारचा दरवाजा उघडला आणि त्यात एक ऑटो घुसला. धडक झाल्यानंतर कार आणि रिक्षाचालक जणू काही घडलेच नाही, असे समजून शांतपणे निघून जातात. हा संपूर्ण प्रकार डॅशकॅम फुटेजमध्ये कैद झाले आहे,' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये एक कार ट्रॅफिकमध्ये उभी असताना एक प्रवासी महिला अचानक कारचा दरवाजा उघडते आणि गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पाठीमागून येणारी एक रिक्षा दरवाजाला धडकते. त्यानंतर संबंधित प्रवाशी महिला कारचा दरवाजा बंद करून निघून जातो. हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडिओला प्रचंड लोकांनी पाहिला आहे. या क्लिपवर लोकांच्या मजेशीर अनेक कमेंट्स येत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: ब्रेड खाण्यापूर्वी आता १० वेळा विचार कराल; बेकरीतील या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे उघडले

या व्हिडिओवर एका नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की,  मी म्हणेन की ही टॅक्सी ड्रायव्हरची चूक आहे. कारचालकांनी प्रवाशांना उजव्या बाजूने उतरण्यास कधीही प्रोत्साहन देऊ नये. नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी उभी करावी आणि प्रवाशांना डाव्या दरवाजातून उतरण्यास सांगावे,' असे एका एक्स युजरने लिहिले आहे.

दुसऱ्या व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे की, अनेक प्रवाशी रस्त्याच्या उजव्या बाजूला उतरतात. कारण हे त्यांचे स्वत:चे वाहन नसते. “खरं तर बेंगळुरूमध्ये असं जास्त घडतं, जिथे लोक टॅक्सी, कारमधून उतरण्यासाठी उजव्या बाजूच्या दरवाजाचा वापर करतात आणि तेही रस्त्याच्या मधोमध. सहसा आम्हाला नेहमी डाव्या बाजूने उतरण्याचा सल्ला दिला जातो”' अशी पोस्ट तिसर् याने केली आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर