Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नात वधू-वराच्या नातेवाईकांमध्ये सुरू असलेली थट्टा-मस्करीला वैतागून भटजीबुवा चक्क पाहुण्यांवर फुलांचे ताट फेकतो. नेमके कशामुळे भटजीबुवाला राग येतो आणि तो पाहुण्यांवर फुलांची ताट फेकून मारतो, हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका लग्न समारंभात भटजीबुवा हातात पूजेचे ताट घेऊन मंत्र पठण करत असून वधू-वर सात फेरे घेत आहेत. तर, वधू-वराकडील पाहूणे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. परंतु, थोड्यावेळात हे पाहूणे एकमेकांच्या अंगावर फुले फेकण्यास सुरूवात करतात. त्यावेळी त्यांच्यामधोमध भटजीबुवा उभे असल्याचे ते विसरून जातात. सुरुवातीला भटजीबुवा दुर्लक्ष करतात. परंतु, फुलांचा वर्षाव वाढल्याने त्यांना राग अनावर होतो आणि त्यांच्या हातात असलेली फुलांची प्लेट ते पाहुण्यांवर फेकून मारतात. भटजीबुवाला इतका राग आल्याने पाहुणे घाबरतात आणि शांतपणे उभे राहतात. त्यानंतर भटजीबुवा कसातरी आपल्या रागावर नियंत्रण मिळवतात.
हा व्हिडिओ सध्या जवळपास प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हे पाहून लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. एक्सवरील राजा बाबू नावाच्या युजरच्या @GaurangBhardwa1 या अकाउंटवरून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला आहे. ज्याला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि ११ हजार लोकांनी लाइक केले आहे.
या घटनेबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला गंमतीदार म्हणत आहेत तर काहींचे म्हणणे आहे की लग्नासारख्या पवित्र कार्यक्रमात अशा प्रकारची कृत्य टाळली पाहिजेत. या घटनेमुळे हा विवाह चर्चेचा विषय बनला आहे.
संबंधित बातम्या