Viral : पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा, उद्घाटनाच्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉल लुटला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral : पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा, उद्घाटनाच्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉल लुटला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Viral : पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा, उद्घाटनाच्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉल लुटला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Sep 02, 2024 12:17 PM IST

Pakistan Dream Bazar viral video ; भिकेला लागलेल्या पाकिस्तानच्या जनतेचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. कराची येथे नव्याने सुरू झालेला एक मॉल उद्घाटणाच्या दिवशीच जमावाने लुटून नेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा, उद्घाटनाच्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉल लुटला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा, उद्घाटनाच्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉल लुटला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Pakistan Dream Bazar viral video : भिकेला लागलेल्या पाकिस्तानचा एक कारनामा पुढं आला आहे. यावेळी पाकिस्तान सरकारने नाही तर तेथील नागरिकांनी हा कारनामा केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची संपूर्ण जगात नाच्चकी झाली आहे. तुम्ही म्हणाल असे काय झालं ? होय ही घटनाच धक्कादायक आहे.

पाकिस्तानच्या कराची येथे एका पाकिस्तानी व्यावसायिकाने करोडो रुपये खर्च करून ड्रीम बाजार नावाचा शॉपिंग मॉल बांधला. पाकिस्तानमधील पहिला मेगा थ्रिफ्ट स्टोअर म्हणून या मॉलचा सोशल मीडियावर प्रचार करण्यात आला. लोकांना आकर्षित करण्यासाठी, मॉल व्यवस्थापनाने पहिल्या दिवशी ५० टक्के पेक्षा कमी किमतीत वस्तु विक्रीची ऑफर ठेवली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. मॉल व्यवस्थापनाला ही गर्दी हाताळला आली नाही. नागरिकांचा एक लोंढा मॉलमध्ये घुसला आणि अर्ध्या तासात त्यांनी संपूर्ण मॉल लुटून नेला.

नागरिकांनी दरवाजे तोडून आत केला प्रवेश

हा मॉल सुरू झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या लोकांनी मॉलच्या दरवाज्या पुढे गर्दी केली होती. लोक मॉलमध्ये घुसण्यासाठी आतुर होते. मात्र, गर्दी जास्त असल्याने मॉलचे दरवाजे बंद करून नागरिकांना तेथेच थांबवण्यात आले. मात्र, ही गर्दी ताब्या बाहेर गेली. नागरिकांनी दरवाजे तोडत थेट मॉलमध्ये प्रवेश केला. परिणामी तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तेथील दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी लाठीमार करून प्रवेशद्वारच तोडले.

मॉल प्रशासन हतबल

दुसरीकडे, मॉल प्रशासनाने लोकांच्या या वागणुकीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पर्यंत पाकिस्तानातील लोकांना परिस्थिती समजत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये सुधारणेला वाव नसल्याचं मॉल मालकानं म्हटलं आहे. मॉलचे मार्केटिंग हेड अनस मलिक म्हणाले की, आम्ही कराचीतील लोकांच्या फायद्यासाठी हे स्टोअर उघडले होते, पण त्यांनी आमचे स्टोअर लुटून नेले.

 

अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण मॉलमधील वस्तु गायब

अर्ध्या तासात हा सर्व प्रकार घडल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दुपारी ३ वाजता त्यांनी दुकान उघडले असता साडेतीन वाजेपर्यंत सर्व सामान चोरीस गेले होते. या गोंधळामुळे कराचीतील जोहर आणि राबिया सिटी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हजारो लोक मॉलमध्ये जबरदस्तीने घुसून मॉल मधील वस्तु लूटतांना दिसत आहेत. यावेळी काही लोकांनी कपडे चोरतानाचा व्हिडिओ देखील तयार केले आहेत आणि सोशल मिडियावर देखील अपलोड केले आहे. मॉल व्यवस्थापनाने त्यांना या उद्घाटनाची माहिती दिली नव्हती, असे पोलिसांचं म्हणणं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर