मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रील बनवण्यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक केले जाम, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Viral Video: रील बनवण्यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक केले जाम, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 30, 2024 01:45 PM IST

Viral Video : व्हिडिओमध्ये दिसते की, फ्लायओवर तेज गतीने गाड्या जाताना दिसत आहेत. इतक्यात एक गाडी अचानक भर रस्त्यात थांबते.

रील बनवण्यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक केले जाम
रील बनवण्यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक केले जाम

सोशल मीडियावररीलबनवण्यासाठी लोक आपल्या जीवाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. रील्स बनवण्याच्या नादात तरुण आपल्याबरोबरच आसपासच्या लोकांचा जीवही धोक्यात घालतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे कारमध्ये सवार तरुणांनी आपली कार भररस्त्यात अचानक थांबवली. असे करण्यामागे कोणती इमरजन्सी नव्हे तर त्यांचारील बनवण्याचा छंद होता.
 

गाड्या थांबवून बेजबाबदार स्टंट-


‘एक्स’ वर ‘@lavelybakshi’ नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पाहा हा बेजबाबदार स्टंट! पश्चिम विहार फ्लायओवरवर ट्रॅफिक रोखणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रील बनवण्याचा छंद म्हणा किंवा नाव कमावण्याची पद्धत. पश्चिम विहारमध्ये फ्लायओवरवर गाड्या थांबवून स्टंट करताना एक तरुणाला पाहण्यात आले.

व्हिडिओमध्ये दिसते की, फ्लायओवर तेज गतीने गाड्या जाताना दिसत आहेत. इतक्यात एक गाडी अचानक भर रस्त्यात थांबते. त्यातील काही तरुण गाडीतून उतरून रील बनवू लागतात. या क्लिपमध्ये गाडीच्या मागे ट्रॅफिक जाम स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर तरुण गाडीत बसतात व भरधाव वेगाने तिथून जाताना दिसतात.

WhatsApp channel

विभाग