Viral Video : कर्नाटक सरकारने तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरीचे पोलिस उपअधीक्षक बी. रामचंद्रप्पा यांना निलंबित केले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेला ऑफिसच्या बाथरूममध्ये नेत तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रामचंद्रप्पा हे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मतदारसंघाचे डीएसपी होते.
गुरुवारी रात्रीपासून सोशल मीडियावर दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या ३५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रामचंद्रप्पा बाथरूममध्ये महिलेसमोर उभे असल्याचे दिसत आहे. तुमकुरूचे एसपी अशोक केव्ही यांनी माध्यमांना सांगितले की त्यांनी ही घटना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ते या बाबत योग्य ती कारवाई करतील.
टाइम्स ऑफ इंडियाने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, "या घटनेचा अहवाल एसपींनी मध्य विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांना (आयजीपी) सादर केला आहे. आयजीपींनी तो पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक आलोक मोहन यांच्याकडे पाठवला आहे. रामचंद्रप्पा यांना शुक्रवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. "
ही महिला गुरुवारी काही व्यक्तींसह मधुगिरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती, असे तपासात निष्पन्न झाले. बाकीचे तपास अधिकाऱ्यांशी बोलत होते. रामचंद्रप्पाने महिलेशी मैत्री करून तिला बाजूला नेले. त्यानंतर दोघेही पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या कोपऱ्याकडे जाताना दिसले. कोपऱ्याच्या शेवटी बाथरूम होतं. या दोघांनी बाथरूममध्ये जाऊन अश्लील कृत्य केले. याच वेळी कोणीतरी बाथरूमच्या खिडकीवर आपला मोबाईल ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला.
मात्र, ३५ सेकंदानंतर रेकॉर्डिंग बंद झाले. महिलेने त्यांचा कुणीतरी व्हिडिओ काढत असल्याचं पाहिलं. यानंतर ती रामचंद्रप्पाच्या मागे लपली, असे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. डीएसपीने महिलेचे कपडे खेचले व तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या पँटची झिप उघडली व महिलेला अश्लील कृत्य करण्यास सांगितले. त्यांच्या कुणीतरी व्हिडिओ काढत असल्याची बाब लक्षात आल्यावर डीएसपी आणि महिला पळून गेल्याचं व व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून गेल्याचं दिसत आहे.
संबंधित बातम्या