मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: आधारकार्डच्या फोटोसाठी चिमुकलीची गोंडस पोज; कितीही वेळा पाहा व्हिडिओ, पण मन काही भरणार नाही!

Viral Video: आधारकार्डच्या फोटोसाठी चिमुकलीची गोंडस पोज; कितीही वेळा पाहा व्हिडिओ, पण मन काही भरणार नाही!

Jul 07, 2024 09:19 PM IST

Viral Video of Girl Posing For Aadhaar Card: आधारकार्ड काढताना चिमुकलीने दिलेल्या पोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

आधारकार्डवरील फोटोसाठी चिमुकलीची अप्रतिम पोज
आधारकार्डवरील फोटोसाठी चिमुकलीची अप्रतिम पोज

Viral News: सोशल मीडियावर नेहमीच नवीन काही पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनावर भुरळ घालतात. अशाच एका व्हिडिओने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे, ज्यात एक चिमुकली आधारकार्डवरील फोटोसाठी गोंडस अशी पोज देत आहे. चिमुकलीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ कितीही वेळा पाहिला तरी मन भरणार नाही, असा आहे.

@gungun_and_mom इन्स्टाग्राम अकाऊंटने पोस्ट केलेल्या या व्हिडिओने निरागसता आणि आनंदाच्या मनमोहक हालचालींनी असंख्य सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये मुलीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. फोटो काढण्यासाठी ती खुर्चीवर उभी असून आपल्या हालचाल थांबवायचे नाव घेत नाहीये. फोटो काढण्याची जबाबदारी असणारी व्यक्तीही मुलीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर तिची हालचाल थांबते.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ २८ जून २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १८.३ दक्षलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहेत आणि ते वाढतच आहेत. या शेअरला जवळपास दहा लाख लाईक्सही मिळाले आहेत. या मुलीची पोज खूपच मनमोहक आहे, असे या व्हिडिओतून दिसते.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले की, “देवा, या जगातील सर्व वाईट नजरेपासून तिला नेहमी वाचवा. ती खूप गोंडस चिमुकली आहे.” आणखी एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे की, "भारतातील संपूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत आधार कार्डवर सर्वात सुंदर फोटो मिळवणारी ती पहिली व्यक्ती असेल." 'आधारकार्ड फोटोशूटदरम्यान माझी मुलगीही असेच करत होती,' अशी प्रतिक्रिया इन्स्टाग्राम युजर मनजीत गिलने दिली आहे. 'गुनगुन आपला आधार फोटो सुंदर दिसावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,' असे आणखी एका युजरने सांगितले. इन्स्टाग्राम युजर ट्विंकलने लिहिले की, “तिचा फोटो दुसऱ्यांचा आधार कार्डसारखा नव्हे तर पूर्णपणे टिपला जावा असा तिचा निर्धार आहे.” इतर अनेक इंटरनेट युजर्सनी हार्ट इमोजीवापरून कमेंट केल्या आहेत. ही मुलगी किती 'मनमोहक' आणि 'निरागस' आहे, असेही काहींनी सांगितले.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर