मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Metro Viral Video: मेट्रोत तरुणींनी खेळली होळी, सोबत अश्लील डान्सही केला; पाहा व्हिडिओ

Metro Viral Video: मेट्रोत तरुणींनी खेळली होळी, सोबत अश्लील डान्सही केला; पाहा व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 23, 2024 01:51 PM IST

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतील तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मेट्रोमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मेट्रोमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Girls Obscene act inside Metro: दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली. या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या आत जमिनीवर बसलेल्या दोन मुली होळीच्या बहाण्याने चित्रपटातील गाण्यावर अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुणी मेट्रोमध्ये एकमेकींसोबत होळी खेळत असल्याची रील बनवत आहेत. परंतु, रील बनवताना दोघेही एकमेकांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओतील दोन्ही तरुणींनी पांढरी साडी परिधान केली असून त्या दीपिका पदुकोण आणि रणबीर सिंह यांच्या २०१३ साली आलेल्या राम-लिला चित्रपटातील 'आंग लगा दे रे' या गाण्यावर रील बनवत आहेत. दिल्ली मेट्रोत पहिल्यांदाच अशा गोष्टी घडल्या नसून यापूर्वीही दिल्ली मेट्रोत पोल डान्स, हस्तमैथुन आणि ओरल सेक्स यांसारखे व्हिडिओ झाले आहेत.

चॉकलेट ice cream ने महिलेने रंगवले केस, त्यानंतर जे झाले... VIDEO व्हायरल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @farismohaab नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 45 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये या तरुणींव्यतिरिक्त मेट्रो कोचमध्ये इतर प्रवासी दिसत आहेत. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हिदुस्थान टाईम्स मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, बंद करा भाऊ, नाहीतर तो दिवस दूर नाही, जेव्हा रील्सच्या नावावर सेक्स गेम्सदेखील होतील. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, हे सर्व सुसंस्कृत सामाजासाठी धोक्याचे आहे. तिसऱ्या युजरने मेट्रोतील वातावरण खूप गरम असल्याचे म्हटले आहे. तर, एका युजरने तुम्ही पार्ट बाय पार्ट रंग लावत आहात का? असा प्रश्न उपस्थित केला.

IPL_Entry_Point

विभाग