Funny Video: माकडे हे त्यांच्या खोडकर वर्तनासाठी ओळखली जातात. वृंदावन आणि मथुरा सारखी शहरे अशा घटनांची साक्षीदार आहेत, जिथे माकडे लोकांच्या वैयक्तिक वस्तू पळवून नेतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने भन्नाट शक्कल लढवून माकडाने पळवलेला आयफोन परत मिळवला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ वृंदावन मंदिरातील असल्याचा बोलले जात आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा माकडाने आयफोन पळवल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत काही माकडे मंदिरावर बसलेली दिसत आहेत. त्यांच्यातील एका माकडाच्या हातात आयफोन दिसत आहे. हा आयफोन मिळवण्यासाठी तरुणाने माकडाच्या दिशेने फ्रुटीचे पॅक फेकले. फ्रुटीसाठी माकडाने हातातील आयफोन सोडला, जो मंदिराच्या खाली लोकांपैकी एका व्यक्तीने पकडला.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करणार्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'वृंदावनची माकडाने एका फ्रुटीसाठी आयफोन विकला.' या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अन्न मिळवण्यासाठी माकडे लोकांची वस्तू चोरतात, असे एका युजर्सने म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या