Man Puts Hand Inside Crocodile Mouth Video: मगर हा पाण्यातील सर्वात खतरनाक प्राणी असल्याचे म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर मगरीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण चक्क मगरीच्या तोंडात हात घालताना दिसत आहे. तितक्यात मगर अचानक संबंधित तरुणाच्या हातावर हल्ला करते. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत होते. सुदैवाने, तरुणाने वेळत मगरीच्या हात बाहेर काढला नाहीतर, मोठी दुर्घटना घडली असते. ही घटना केव्हा आणि कुठे घडली? याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलातील अनेक प्राणी मानवी वस्त्यांमध्ये आढळून आले. असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ज्यात दोघे तरुण एका मगरीला चक्क दुचाकीवरून घेऊन जातांना दिसले. मगरीला रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान वडोदरा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर २४ मगरी पुराच्या पाण्यात वाहून शहरात आल्या. या मगरी वडोदरा शहरात विविध परिसरात दाखल झाल्या आहेत. या मगरींचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.
सोशल मीडियावर व्हायरल होत एका व्हिडिओत एक व्यक्ती मगरी चक्क झोपलेल्या मगरीजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मगरीच्या हल्ल्यापासून बचावण्यासाठी त्याने अंगावर मगरीचा पोशाख घातल्याचे दिसत आहे. मगर एवढी गाढ झोपेत असते की ती उठत नाही. खूप प्रयत्नानंतर ती उठते पण शांतपणे नदीकडे जाते. परंतु, असे करणे एखाद्या जीवावर बेतू शकते. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. lifequotessuccess या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. चार दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला जवळपास २५ हजार लोकांनी लाईक्स केले आहे. तर, हजारो लोकांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित बातम्या