Viral News: महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि एकूणच महिलांसाठी सुरक्षित आणि मोकळे आणि निर्भय वातावरण राहिले नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर बदलापूर येथील शाळेत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण सगळ्यांसमोर एका महिलेसोबत घारणडे कृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला मॉलमध्ये खरेदी करताना दिसत आहे. तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक तरुण येतो आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. यानंतर महिला संबंधित तरुणाला जाब विचारते. दोघांमध्ये काही बोलणे झाल्यानंतर महिला तिथून निघून जाते. काही वेळाने ती एका तरुणासोबत पुन्हा त्याच ठिकाणी येते, जिथे तिची छेड काढण्यात आली होती. महिलेसोबत आलेला तरुण छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण करतो. या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'व्वा! काय पराक्रम आहे.' दुसऱ्याने लिहिले आहे की, 'त्या तरुणाची हीच पात्रता आहे.' तिसऱ्या व्यक्तीने महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, 'सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करण्याचे धाडस तरी कसे होते. त्यांना कशाचीही भिती वाटत नाही का?' आणखी एकाने असे म्हटले आहे की, 'महिलेची छेड काढणाऱ्याला भावाने चांगलाच धडा शिकवला आहे, त्याला आणखी चोप द्यायला हवा होता.'
नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना एका महिलेने चांगलाच छडा शिकवला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित महिला आपल्या मुलीसोबत जात असताना काही रोड रोमोयोंनी तिच्या मुलीची छेड काढली. यामुळे संतापलेल्या महिलेले भरचौकात त्यांची धुलाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले.