Viral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Nov 02, 2024 10:27 PM IST

woman jumped from moving train: पतीशी झालेल्या वादातून एका महिलेने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी
व्हायरल व्हिडिओ: महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी

Madhya pradesh woman jumped from moving train: पती-पत्नीमध्ये नेहमीच किरकोळ कारणांवरून वाद होत असतात. परंतु, मध्य प्रदेशात पतीसोबत भांडण झाल्यानं एका महिलेने चक्क धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. मध्य प्रदेशातील ओरई आणि अटा दरम्यान धावणाऱ्या बरौनी एक्स्प्रेसमधून ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून बडबड करताना दिसताना आहेत. इतर प्रवाशी या महिलेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहेत. त्यानंतर ही महिला ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि उडी मारण्याचा प्रयत्न करते. तितक्यात एक महिला येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तरीही ती ट्रेनच्या खाली उडी मारते. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. मात्र, महिलेचा जीव वाचला की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पतीने जाणूनबुजून आपल्या पत्नीला ट्रेनमधून उडी मारण्याची परवानगी दिली, असे काही लोक म्हणत आहेत. तर, काही लोक म्हणतात की दारूच्या नशेत होती. पतीशी भांडण झाल्यानंतर तिने स्वतः हून ट्रेनमधून उडी मारली. व्हिडिओमध्ये धक्का बसलेले प्रवासी आणि त्रासलेली मुले स्पष्टपणे दिसत आहेत.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे मुलीसोबत अश्लील चाळे

यूपीच्या बागपत जिल्ह्यातून एका काँग्रेस नेत्याचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एक मिनिट ३४ सेकंदाचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, खोलीत एक मुलगी उभी आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दालनात आहेत. काँग्रेस नेते वारंवार मुलीला आपल्या खोलीत बोलावताना दिसत आहेत. त्यानंतर ती मुलगी काँग्रेस नेत्याकडे जाते. मुलगी खोलीत पोहोचताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिला पकडतात आणि मग अश्लील कृत्य करण्यास सुरुवात करतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर दिल्ली हायकमांडने त्यांना पदावरून हटवून टाकले आहे. काँग्रेस शहराध्यक्ष राकेश शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्हाध्यक्षांचे हे कृत्य राज्य संघटनेने गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. युनूस चौधरी यांनी पक्षाची प्रतिमा मलीन केल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर