मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: मेकअप करून आलेल्या आईला पाहून मुलगा म्हणतोय, कोण आहेस तू? व्हिडिओ बघून पोट धरून हसाल

Viral Video: मेकअप करून आलेल्या आईला पाहून मुलगा म्हणतोय, कोण आहेस तू? व्हिडिओ बघून पोट धरून हसाल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 01, 2024 04:41 PM IST

Makeup Viral Video: मेकअप करून आलेल्या ओळखू न शकलेल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा मेकअप करून आलेल्या त्याच्या आईला ओळखू शकला नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा मेकअप करून आलेल्या त्याच्या आईला ओळखू शकला नाही.

Mom and Son Viral Video: सोशल मीडियावर दररोज शेकडो हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात. मात्र, यातील काही व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला मजबूर करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात एक महिलेने असा मेकअप केला की, चक्क तिच्या तिच्या मुलालाही तिला ओळखता आले नाही. महिला आपल्या मुलाला मी तुझी आई असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मुलगा तिचे ऐकायला तयार नाही. हे पाहून तिच्या आजूबाजुला असलेल्या लोकानांही हासू आवरता येत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये महिला तिच्या मुलाला घेऊन एका पार्लरमध्ये जाते. पार्लरमध्ये गेल्यानंतर महिलेने तिच्या मुलाला सोफ्यावर बसवून स्वत:चा मेकअप करायला गेली. मेकअप पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या मुलाजवळ येते. मात्र, तो तिला ओळखतच नाही. यानंतर मुलगा मोठ्याने रडायला सुरुवात करतो आणि त्याच्या आईला शोधतो. महिलेने वारंवार सांगूनही तो तिचे ऐकायला तयार नाही.

Covishield : कोव्हिशिल्डमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम! हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता; लस घेणाऱ्यांचे टेन्शन वाढले

आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर शेकडो व्हिडीओ पाहिले असतील. पण या व्हिडिओमध्ये जो प्रकार दिसला तो याआधी क्वचितच पाहिला असेल. हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पार्लर वाल्यांना विनंती आहे की, असा मेकअप करू नका, ज्यामुळे त्यांचे मुले त्यांना ओळखू शकणार नाहीत.

Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली 'ही' कारवाई

मिठाई खाण्याच्या वादातून वधू-वरांमध्ये हाणामारी

सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एका वेगळ्याच लेव्हलचे दृश्य दिसले. यामध्ये वधू-वर तसंच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चक्क मिठाई खाण्याच्या वादातून मारामारी होते. व्हायरल व्हिडिओमध्ये नवरीच्या गळ्यात वरमाळा घातल्यानंतर नवरा तिला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. नवरदेवाने मिठाई खाऊ घालण्यासाठी हात वर केल्यानंतर नवरी दुसरीकडे तोंड फिरवते. असे दोन तीन वेळा झाले. यावर संतापलेल्या नवरदेवाने जबरदस्तीने मिठाई नवरीच्या तोंडात घातली. यामुळे पेटलेल्या वादातून नवरी नवरदेवामध्ये हाणामारी सुरू झाली. हे प्रकरण इतके पुढे जाते की लग्न मोडते.

IPL_Entry_Point

विभाग