मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: घरात घुसून सिहिंणीने केली पाळीव श्वानाची शिकार, पाहा अंगावर काटा आणणारे दृष्य

Viral Video: घरात घुसून सिहिंणीने केली पाळीव श्वानाची शिकार, पाहा अंगावर काटा आणणारे दृष्य

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2024 07:04 PM IST

Lioness Video Viral : जंगलातून आलेली एक हिंस्त्र सिंहीण रहिवाशी भागात येऊन पाळीव कुत्र्यावर हल्ला करते तसेच त्याला आपली शिकार बनवते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सिहिंणीने केली पाळीव श्वानाची शिकार
सिहिंणीने केली पाळीव श्वानाची शिकार

सामान्यपणे हिंस्त्र पशू जंगलातच पाहायला मिळतात किंवा प्राणीसंग्रहालयात पाहिले जाऊ शकतात. पिंजऱ्यात कैद पशू लोकांना काही नुकसान पोहोचवू शकत नाहीत, मात्र अनेक वेळा जंगलांतून रहिवाशी भागात आलेले जंगली पशू (Wild Animals) माणसांमध्ये दहशत माजवण्याबरोबरच पाळीव प्राण्यांवरही हल्ले करतात.

अशाच पद्धतीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जंगलातून आलेली एक हिंस्त्र सिंहीण रहिवाशी भागात येऊन पाळीव कुत्र्यावर हल्ला करते तसेच त्याला आपली शिकार बनवते. हे दृष्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडिओ animalsvaultनावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तो अनेक वेळा पाहिला जात आहे. यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, कुत्रा मेला काय, अन्य एकाने लिहिले की, सिंहिणी भुकेलेली असेल. तिला तसे करू द्या जी सामान्यपणे करते. तुम्ही त्याच्याजागी दुसरे कुत्रे पाळू शकता.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, जंगलातून रहिवाशी इलाक्यात आलेली सिंहिणी एका घराबाहेर असलेल्या कुत्र्याला आपली शिकार बनवते. दरम्यान यावेळी घरचे लोक कुत्र्याला सिंहिणीच्या जबड्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. सिहिंणीवर काठ्या भिरकावल्या जातात. मात्र सिहिंणीवर कोणताही परिणाम होत नाही. ती कुत्र्याला सोडत नाही. तिचा आक्रमक पवित्रा पाहून कोणीही तिच्याजवळ जाण्याचे धाडस करत नाही.

IPL_Entry_Point

विभाग