रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून आली सुपरफास्ट ट्रेन आणि मग…; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून आली सुपरफास्ट ट्रेन आणि मग…; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल!

रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून आली सुपरफास्ट ट्रेन आणि मग…; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल!

Dec 25, 2024 01:47 PM IST

Kerala Train Viral Video: केरळमध्ये रेल्वे रुळावरून चालताना अचानक एका व्यक्तीच्या समोर सुपरफास्ट ट्रेन आली. त्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्याने अशी शक्कल लढवली की, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून आली सुपरफास्ट ट्रेन आणि मग…; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल!
रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून आली सुपरफास्ट ट्रेन आणि मग…; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल! (RAJ K RAJ /HT PHOTO)

Indian Railway Viral Video: केरळमधील कन्नूर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे रुळावरून चालताना अचानक समोरून एक सुपरफास्ट ट्रेन आली. यावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी संबंधित व्यक्ती थेट रेल्वे रुळावर झोपला. ट्रेन जाऊपर्यंत तो व्यक्ती कोणतीही हालचाल न करता तिथेच झोपून राहिला. ट्रेन गेल्यानंतर तो उठतो आणि तिथून निघून जातो. कन्नूर आणि चिरक्कल रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव पवित्रन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवित्रन हे ५६ वर्षांचे आहेत. रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पवित्रनचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पवित्रनने दिलेल्या माहितीनुसार, तो फोनवर बोलत होता आणि समोरून ट्रेन येत असल्याचे त्याला समजले नाही. ट्रेन इतकी जवळ आली की, त्याला बाजुला होणे देखील कठीण झाले. यामुळे त्याने तिथेच रेल्वे रुळावर झोपण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

या घटनेवर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. 'व्हिडिओ पाहून आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. ट्रेनला पाहून त्याने लगेच झोपण्याचा निर्णय घेतल्याने तो सुरक्षित राहिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, एक मद्यधुंद व्यक्ती फूटपाथवर पडून असल्याची अफवा पसरू लागली. यावर पवित्रन स्पष्टीकरण दिले. घटनेच्या वेळी मी दारू प्यायलो नव्हतो. स्वत: जीव वाचवण्यासाठी मी रेल्वे रुळावर झोपलो. शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पवित्रन यांनी सांगितले की, या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. ते अजूनही या घटनेतून सावरलेले नाहीत.

रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा

रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा असूनही अनेक जण रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर न करता थेट रुळावून एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करताना दिसतात. मात्र, असे करणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.बेकायदेशीरपणे रुळ ओलांडणाऱ्यांनाही धडक मोहीम राबवून पकडले जात आहे. रेल्वे कायद्याचे कलम १४७ रेल्वे रुळ ओलांडण्याच्या गुन्ह्याखाली एखाद्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते. असे करताना आढळल्यास त्या व्यक्तीला ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तर, १००० रुपयांपर्यंत दंडाचीही तरतूद आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर