Viral Video: पुराच्या पाण्यात कारसह दाम्पत्य गेले वाहून, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: पुराच्या पाण्यात कारसह दाम्पत्य गेले वाहून, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Viral Video: पुराच्या पाण्यात कारसह दाम्पत्य गेले वाहून, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Nov 26, 2024 04:02 PM IST

Brazil Flood: मुसळधार पावसामुळे ब्राझीलमध्ये आलेल्या पुरामुळे एक इन्फ्लुएंसर महिला आणि पतीसह वाहून गेल्याची घटना घडली.

व्हायरल व्हिडिओ: पुराच्या पाण्यात कारसह दाम्पत्य गेले वाहून
व्हायरल व्हिडिओ: पुराच्या पाण्यात कारसह दाम्पत्य गेले वाहून

Viral News: एका इन्फ्लुएंसर आणि तिच्या पतीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दोघेही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. ही घटना ब्राझीलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर सोरेस मार्टिन, असे मृत्यू झालेल्या इन्फ्लुएंसर महिलेचे नाव आहे. जेनिफर ही आपल्या पतीसह पुरात अडकली होती. अतिवृष्टीमुळे संपूर्ण उबरलँडिया शहरात अनेक भागात पाणी साचले. या पुराच्या पाण्यात दोघेही कारसह पाण्यात अडकले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. या घटनेपूर्वी जेनिफर यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. कोणास ठाऊक होते की, हा तिचा शेवटचा व्हिडिओ ठरेल.

डेलीमेलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या कारला चिकटून उभी आहे आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या पतीला पतीला तिने पकडले आहे. लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि शिडीच्या सहाय्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. अधिकाऱ्यांनी नंतर पुष्टी केली की जेनिफरचे पती, वॉलिसन लिमा पुरातून वाचले. मात्र, नंतर त्याचाही मृत्यू झाला.

जेनिफरच्या मृत्यूनंतर वॉलिसन लिमा यांनी सोशल मीडियावर मला फक्त ती परत हवी होती, असे लिहिले. तसेच काही इमोशनल इमोजी पोस्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे ८ वर्षांपासून वैवाहिक जीवन जगत होते आणि जवळपास १४ वर्षांपासून एकमेकांसोबत राहते होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर