सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो, रस्त्यावर, विमानतळाबाहेरील भाग आणि अगदी उड्डाणादरम्यानही व्यक्ती नाचताना दिसण्याच्या घटनांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. नुकतीच इंडिगोच्या विमानात एक महिला डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानाच्या उड्डाणादरम्यान महिलेल्या केलेल्या नृत्यावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
सलमा शेख या महिलेने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये एक महिला काळ्या रंगाची साडी परिधान करत विमानाच्या मधोमध जाऊन डान्स करताना दिसत आहे. इतर प्रवासी आपापल्या सीटवर बसलेले असताना आणि फ्लाइट अटेंडंट ओव्हरहेड डबा बंद करत असताना महिला तामिळ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. तिच्या पाठीमागे इतर प्रवासी तिचा डान्स पाहताना दिसत आहेत.
ही पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका व्यक्तीने लिहिले, “इतरांना त्रास का द्यायचा?” इन्स्टाग्राम युजर निशान ख्रिस्तोफर यांनी म्हटले आहे की, ही कोणत्या प्रकारची एअरलाइन आहे? या महिलेला विमानात रील बनण्याची परवानगी कशी देत आहेत? विमान कंपनीने या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून पुन्हा असे कोणीही करू शकणार नाही.
गौतम साई नावाच्या आणखी एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कदाचित तुमच्याकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चौथ्या पोस्टमध्ये लिहिले की, "एअर होस्टेसने तिला रील्स कसे बनवू दिले? एअर होस्टेससुद्धा घाबरली असेल.
अशा प्रकारच्या लोकांना विमान प्रवासावर बंदी घालायला हवी, असे इन्स्टाग्राम युजर अर्जुनने म्हटले आहे.
विमान प्रवासात सामान हरवल्यानंतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र एका करोडपती तरुणानं याबाबत ए्अरलाईन्स कंपनीला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याच्या प्रेयसीची सुटकेस हरवल्यानंतर, त्याने थेट नवी वेबसाइटच तयार केली. या वेबसाइटमध्ये विमान कंपन्यांना सामान हरवल्यानुसार रेटिंग देता येतं. पीटर लेव्हल्स असे या करोडती बॉयफ्रेंडचे नाव असून तो मूळचा नेदरलँड येथील बांधकाम व्यावसायिक आहे. त्यानं ४० हून अधिक स्टार्टअप सुरू केले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने १२ महिन्यांत १२ स्टार्टअप सुरू करून प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
संबंधित बातम्या