सुंदर आणि अलिशान घर खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. जगातील सर्वात महागड्या ठिकाणी स्वत:चे घर झाले तर, यापेक्षा मोठे यश नाही. भारतीय वंशाच्या एका अभियंत्याने कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथे अलिशान घर विकत घेतले. हे घर एखाद्या सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीत. या घरात अशा काही सुविधा आहेत, ज्याची कल्पना कोणीच केली नसेल. या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी या घराला स्वप्नातील घर असे बोलत आहेत.
इन्स्टाग्राम युजर प्रियम सारस्वतने या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर जबरदस्त फॉलोअर्स असलेला प्रियम हा भारत आणि परदेशातील होम टूर्स शेअर करण्यासाठी ओळखला जातो. नुकताच प्रियम सारस्वतने शेअर केलेला हाऊस टूरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हिडिओमध्ये या जोडप्यांनी त्यांच्या आलिशान घराच्या विविध विभागांची ओळख करून दिली आहे. या घरात एक प्रभावी चित्रपटगृह, तलाव, गार्डन, गेमिंग रुमसह अनेक लक्झरी गोष्टी आहेत. हे घर एखाद्या सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभियंत्याने आपला प्रवास शेअर करताना सांगितले की, ‘माझा जन्म भारतात झाला, मी आता गेल्या २० वर्षांपूर्वी बे एरियामध्ये आलो, विविध स्टार्टअप्समध्ये काम केले आणि आता माझी स्वतःची एक कंपनी आहे.’
हा व्हिडिओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अवघ्या काही तासांत ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. घराचा आकार आणि सोयी सुविधा पाहून आश्चर्य व्यक्त केले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘सिलिकॉन व्हॅलीमध्ये असे घर आहे, यावर माझा विश्वासबसत नाही’. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘माझ्या घरात इतक्या सोयी सुविधा असत्या तर मी घराबाहेरच पडलो नसतो.’ तिसऱ्या युजरने कमेंट करताना असे म्हटले आहे की, ‘कुटुंबासोबत राहण्याची मज्जाच वेगळी आहे. आपल्या मुलाचे यश पाहून त्यांच्या पालकांनाही खूप आनंद होत असेल.’ ‘या घरातील गार्डन माझ्या घरापेक्षा मोठे आहे', असे एकाने म्हटले आहे.