Guinness World Record: भारतात प्रतिभेची कमतरता नाही. देशात असे अनेक प्रतिभावान लोक आहेत, ज्यांचे कार्य जगाला चकित करते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क आपल्या जीभेने वेगाने धावणारे फंखे थांबवतो. या तरुणाच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक या व्यक्तीला ड्रिल मॅन म्हणूनही ओळखतात.
तेलंगणातील क्रांती कुमार पणिकेरा याने एक विचित्र पराक्रम करून आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले. पणिकेराने एका मिनिटात ५७ इलेक्ट्रिक पंखे आपल्या जिभेने बंद केले. पणिकेरा हा सूर्यपेटचा रहिवासी असून तो त्याच्या विचित्र स्टंटसाठी प्रसिद्ध आहे.
पणिकेरा हा जीभे व्यतिरिक्त आपल्या बोटांनीही फिरणारा पंखा थांबवतो. एवढेच नव्हेतर तो आपल्या नाकात ड्रील मशीन देखील टाकतो. तो अनेक लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे. त्याने चार वेळा गिनीज रेकॉर्ड केले आहेत. अलीकडेच तो पुन्हा एकदा चर्चेत आला, जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने पानिकेराचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
व्हिडिओ शेअर करताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने लिहिले की, क्रांती कुमार पणिकेरा या ड्रिलमॅनने एका मिनिटात त्याच्या जीभेचा वापर करून ५७ इलेक्ट्रिक पंखे थांबवले. व्हिडिओमध्ये पणिकेरा त्याच्या जीभेचा वापर करून धावणारा पंखा थांबवताना दिसत आहे.हा व्हिडिओ ६ कोटी लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
पणिकेरानेही या व्हिडिओवर आनंद व्यक्त केला आणि लिहिले की, ‘मी एका छोट्या गावातून आलो आहे, जिथे मोठे स्वप्न पाहणे आपल्यासाठी खूप मोठे वाटते. परंतु, आज चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणे अविश्वसनीय वाटते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे मान्यता मिळाल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि कृतज्ञ आहे. हे यश केवळ वैयक्तिक यश नाही तर मी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेल्या मेहनतीचा दाखला आहे.’
संबंधित बातम्या