मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाप रे.. चिकन नीट शिजवलं नाही म्हणून पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं, Video Viral

बाप रे.. चिकन नीट शिजवलं नाही म्हणून पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं, Video Viral

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2024 12:02 AM IST

Viral Video : महिलेला पतीने खाली फेकले की, पतीसोबत झालेल्या वादनंतर महिलेने खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याचा तपास केला जात आहे.

पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं, Video Viral
पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं, Video Viral

Viral Video : पती व पत्नीमध्ये घरगुती वादाची अनेक प्रकरणे समोर येत असतात. कोणत्या ना कारणामुळे पती आणि पत्नीमध्ये (Husband-Wife) टोकाची भांडणे होतात. मात्र कुणीतरी एकाने समजूतदारपणा दाखवल्यास ही भांडणे सामोपचाराने मिटवली जातात. मात्र काही वेळी पुढचा मागचा कशाचाही विचार न करता रागाच्या भरात कृती केली जाते व याचा आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो. पती पत्नीवर जीवघेणा हल्ला करतो तर कधी तिची हत्याही केली केली जाते. अनेकदा हा वाद क्षुल्लक कारणांमुळे झालेला असतो.

ट्रेंडिंग न्यूज

अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, एक महिला अनेक मजली इमारतीवरून खाली रस्त्यावर कोसळताना दिसत आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक संपात व्यक्त करत आहेत.

Lamborghini Car : मुलाच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गिफ्ट दिली ५ कोटींची लम्बोर्गिनी कार; पाहा VIDEO
या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासरच्या लोकांनी या महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर पतीने तिला इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकलं. रस्त्यावर कोसळल्याने ही महिला जोरात किंचाळली. तिच्या आवाजाने शेजारचे लोक धावत आले आणि त्यांनी या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना पाकिस्तानमधली असून ९ मार्चला घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने घरी चिकन बनवलं होतं. मात्र हे चिकन व्यवस्थित शिजलं नव्हतं. या कारणावरून पती चांगलाच संतापला. त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला जबर मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन घराच्या खिडकीतून थेट खाली ऱस्त्यावर फेकलं. यात महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्टर झाले आहेत.

लाहोर शहरात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचं नाव मरियम असं आहे. मरियमच्या तक्रारीवरुन आरोपी पती आणि सासरच्या लोकांना अटक करण्यात आली आहे. महिलेला खिडकीतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत असून त्यांनी या लोकांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. महिलांना मान-सन्मान न देणाऱ्या लोकांना जन्मठेप द्यावी अशी मागणी एका युजरने केली असून अतिशय क्षुल्लक कारणावरुन महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिलेला पतीने खाली फेकले की, पतीसोबत झालेल्या वादनंतर महिलेने खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याचा तपास केला जात आहे.

IPL_Entry_Point