Girl Jumps Off Running Train: धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, तरीही अनेकजण आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. परंतु, असे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी धावत्या रेल्वेतून उडी मारताना दिसत आहे. उडी मारल्यानंतर संबंधित तरुणी तोंडावर आपटल्याचे दिसते आहे. हा संपूर्ण प्रकार इतर प्रवाशाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी धावत्या ट्रेनच्या दारात बसलेली दिसत आहे. त्यानंतर हळूच ती धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ती ट्रेनच्या खालच्या दिशेने असणाऱ्या पायऱ्यावर उभी राहते. ट्रेनचा वेग कमी होताच ती उडी मारते आणि तोंडावर आपटते. व्हिडिओ शेवटी दिसते की, उडी मारलेली तरूणी जमीनीवर शांतपणे पडलेली दिसत आहे. कदाचित तिला गंभीर दुखापत झाली असावी, अशी भिती व्यक्ती केली जात आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही जणांनी तरुणीने अतिशहाणपणा दाखवल्याचे बोलले आहे. तर, काही जण व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाला दोष देत आहेत. हा व्हिडिओ ८ फेब्रुवारी ट्विटरद्वारे शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
या घटनेचा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी तरुणीला न आडवता व्हिडिओ शूट केला, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर, दुसऱ्या युजरने तरुणाच्या बाजूने आपले मत मांडले आहे. “तरुणाने तिला ट्रेनच्या वेगाबद्दल इशारा दिला. पण तिने त्याचे ऐकले नाही. जर त्याने तिच्या हाताला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिने आरडा- ओरडा केला असता तर सर्वांनी त्यालाच मारहाण केली असते. त्याच्याकडे पुरावा आहे की, त्याने तिला ट्रेनखाली ढकलेले नाही.