मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतलं; ग्रामपंचायतीनं मुलाला दिली 'अशी' शिक्षा

Viral Video: रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतलं; ग्रामपंचायतीनं मुलाला दिली 'अशी' शिक्षा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 13, 2024 10:10 PM IST

Mathura Youth Kiss Bengal Girl Viral Video: धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मथुरा येथेआलेल्या मुलीचे स्थानिक मुलाने जबरदस्तीने चुंबन घेतले.

मथुरा येथील रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मथुरा येथील रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mathura Viral Video: सोशल मीडियावर एक चिंताजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक अल्पवयीन मुलगा रस्त्याने जाणाऱ्या मुलीचे चुंबन घेऊन पळून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरेतील (Mathura) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी तिच्या कुटुंबासह मथुरेत आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मुलीचा विनयभंग झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, पीडित मुलगी एका हातात बाळाला घेऊन रस्त्याने चालताना दिसत आहे. तितक्यात तिच्या पाठीमागून आलेला एक मुलगा जबरदस्तीने तिचे चुंबन घेतो आणि घटनास्थळावरून पळून जातो.

Sydney terror attack: सिडनीत मॉलमध्ये माथेफिरुचा चाकूहल्ला! चौघांचा मृत्यू; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार

हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत बोलवण्यात आली. ग्रामपंचायती मुलाला स्वत:ला १० वेळा चप्पलने मारण्याची शिक्षा दिली. या घटनेनंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय पश्चिम बंगालला परत गेले.सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी मुलाची ओळख पटलेली नसून अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

School bus Accident : १२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; ६ मुलांचा मृत्यू, दारूच्या नशेत होता चालक

मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. असे घृणास्पद कृत्य करूनही मुलाला फक्त स्वत:ला चप्पल मारून घेण्याची शिक्षा दिल्याने ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणीही तक्रार नोंदवली नाही. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे आरोपी मुलाचे घृणास्पद कृत्य लोकांसमोर आले.

पत्नीला फोनवर बोलताना पाहून पतीने तिचा कुऱ्हाडीने हात तोडला

मध्य प्रदेशमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले. पत्नीला फोनवर बोलताना पाहून आरोपी पतीने चक्क कुऱ्हाडीने तिचा हात तोडला. एवढेच नव्हेतर, आरोपी पीडिताचा तुटलेला हात घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे. ही घटना मध्य प्रदेश राज्यातील अशोकनगर जिल्ह्यातील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आरोपीने पत्नीचा हात का तोडला? यामागचे नमके कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग