Viral News: अनेकांना घरात कुत्रे पाळायला खूप आवडतात. अनेक प्रसंगी हे कुत्रे त्यांच्या मालकाचा जीवही वाचवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका कुत्र्याने घराच्या बागेत खेळणाऱ्या मुलांना चक्क जगातील सर्वात विषारी सापापैकी एक कोब्रापासून वाचवले.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Bhupend29375158 नावाच्या युजरने शेअर केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या झाशी येथील आहे. श्रीगणेश कॉलनीतील एका घराच्या बागेत काही मुले खेळत होती. दरम्यान, एक कोब्रा साप त्यांच्या दिशेने येताना पाहून मुले घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. मात्र, बागेतच पाळीव पिटबुल कुत्र्याला साप दिसताच त्याने लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कोब्रावर हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याने कोब्राला जबड्यात धरले, शेवटी कुत्र्याने सापाला मरेपर्यंत सोडले नाही.
पिटबुल कुत्राच्या शौर्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी पिटबुल कुत्राच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की,सापाने बागेत येऊन आज चूक केली. हा पिटबुल कुत्रा खरोखरच हिरो आहे. दुसऱ्या एका युजरने अशी कमेंट केली आहे की, पिटबुल जातीचे कुत्रे शक्तीशाली नव्हेतर हुशार देखील असतात. त्याने अत्यंत चपळाईने सापाला ठार केले. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, बिचाऱ्या सापाला माहिती नव्हते की पिटबुल कुत्रा त्याची वाट पाहत बसला आहे.
साप आणि मुंगूस यांच्यातील भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका मुंगूसने एका झटक्यात सापाला मारले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक साप फणा पसरवून उभा असल्याचे दिसत आहे. आजूबाजूला कुठेतरी मुंगूस असल्याची त्याला जाणीव झाली. तितक्यात मुंगूस सापावर हल्ला करतो आणि त्यांना त्याला ठार करतो.