Viral Video: दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा, पोलिसांशीही घातला वाद!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा, पोलिसांशीही घातला वाद!

Viral Video: दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा, पोलिसांशीही घातला वाद!

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 13, 2025 04:11 PM IST

Nashik Drunk Girl Video: नाशिकमध्ये मध्यरात्री पार्टी करून आलेल्या तरुणीने भररस्त्यात गोंधळ घातला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा
व्हायरल व्हिडिओ: दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा

Nashik Viral News: नाशिकमध्ये लेट नाईट पार्टीवरून परतणाऱ्या मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात पोलिसांनी वाद घातला. पोलीसांशी हुज्जत घालणार्‍या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित तरुणी मित्रासह दारू पिऊन दुचाकीवरून जात असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी गंगापूर रोडवर येथे त्यांची दुचाकी थांबवून विचारपूस केली असता तरुणीने त्यांच्याशी हुज्जत घातली. ही घटना १० फेब्रुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. तर, व्हिडिओ रेकॉर्ड काढणाऱ्या व्यक्तीला ती व्हिडिओ का काढत आहे? अशी विचारणा करते. यावर व्हिडिओ काढणारा व्यक्ती तिला उद्धटपणे उत्तर देते. पुढे तरुणी मद्यधुंद अवस्थेत तिच्या मित्राला तेथून जाऊ, असे बोलते. तरुणीसोबत असलेला तिचा मित्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ती कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नाही.

व्हिडिओत तरुणी पोलिसांजवळ जाऊन बोलते की, 'व्हिडिओ करण्याचे काही कारण नाहीये. आम्ही तुम्हाला काही करत नाहीये, आम्ही दूर थांबलो आहोत. आम्ही नशेत आहोत, आम्ही दारू पिऊन आलो आहोत, तुम्हाला काय त्रास होतोय.' त्यानंतर तरुणीचा मित्र तिला घेऊन बाजूला जातो. दरम्यान, तरुणीच्या मित्राने मद्यपान केले होते की नव्हते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

@NCMIndiaa या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिस पैस उकळण्यासाठी त्रास देत आहे असा आरोप केला. तर, काहींनी मद्यधुंद तरुणीवर टिका केली. एका व्यक्तीने म्हटले आहे की, बार वेळत बंद झाले तर, अशा घटना टाळता येऊ शकतात. सामान्य जनतेवर दादागिरी दाखवण्यापेक्षा बारवाल्यांना आणि क्लबवाल्यांविरोधात कारवाई करा. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, हे असले बाहेरून महाराष्ट्रात शिकायला आलेले. अशा लोकांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, पोलिसांना दारुची दुकान बंद करायचा हिंमत होत नाही आणि सामान्य जनतेला त्रास देत आहेत. चौथ्या व्यक्तीने म्हटले की, तरुणीची चूक आहेच, पण पोलिसांनीही थोडे नरमाईने बोलायला पाहिजे. तरुणीसोबत असलेला तरुण आदराने बोलत आहे. त्याठिकाणी महिला पोलीस नाही. त्यांना समज देऊन दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बोलवले पाहिजे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर