Viral Video : कारमध्ये रोमान्स करताना चुकून गिअरला धक्का लागल्यानं कार थेट नदीत; जोडप्यावर नग्नावस्थेत पळून जाण्याची वेळ-viral video couples romance in car goes wrong as suv submerges in philadelphia river ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : कारमध्ये रोमान्स करताना चुकून गिअरला धक्का लागल्यानं कार थेट नदीत; जोडप्यावर नग्नावस्थेत पळून जाण्याची वेळ

Viral Video : कारमध्ये रोमान्स करताना चुकून गिअरला धक्का लागल्यानं कार थेट नदीत; जोडप्यावर नग्नावस्थेत पळून जाण्याची वेळ

Sep 17, 2024 04:05 PM IST

Couples Romance in Car: कारमध्ये रोमान्स करत असताना जोडप्यासोबत धक्कादायक घटना घडली.

कारमध्ये रोमान्स करणे पडले महागात
कारमध्ये रोमान्स करणे पडले महागात

Viral News: अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे कारमध्ये रोमान्स करणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित जोडपे कारमध्ये रोमान्स करत असताना अचानक गिअरला धक्का लागला. यानंतर पार्किंगमध्ये उभी असलेली कार थेट नदीत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने त्यांचा जीव वाचला. परंतु, त्यांच्यावर नग्नावस्थेत पळून जाण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फिलाडेल्फिया सिटी हॉलपासून ३ किमी अंतरावर असलेल्या फेअरमाउंट पार्कमध्ये घडली. संबंधित जोडपे त्यांची कार रेंज रोव्हरमध्ये रोमान्स करत असताना त्यांच्यासोबत असा प्रकार घडला. रोमान्स सुरू असताना त्यांचा गिअरला स्पर्श झाला आणि कार थेट नदीत कोसळली. सुदैवाने, कार नदीत पडण्यापूर्वीच जोडप्याने कारबाहेर उडी मारून आपला जीव वाचवला.

@AlyssaCristelli या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत पोलीस जोडप्यांची कार पाण्याबाहेर काढताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘जोडपे कारमध्ये रोमान्स करत असताना त्यांचा चुकून गिअरला धक्का लागला आणि कार नदीत पडली.’

छत्रपती संभाजीनगर: रीलच्या नादात कार दरीत कोसळली; तरुणीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात इन्स्टाग्रामवर रील बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. श्वेता दिपक सुरवसे (वय, २३) असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता ही छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ कारमध्ये बसून रील बनवत होती. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत श्वेता हिचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

Whats_app_banner
विभाग