Viral Video: स्विस इंटरनॅशनलच्या विमानात एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: स्विस इंटरनॅशनलच्या विमानात एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: स्विस इंटरनॅशनलच्या विमानात एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Dec 07, 2024 10:15 AM IST

Couple Having Sex In Airplane: बँकॉकहून झुरिकला जाणाऱ्या स्विस एअरलाइन्सच्या विमानात एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: स्विस इंटरनॅशनलच्या विमानात एका जोडप्याचा रोमान्स
व्हायरल व्हिडिओ: स्विस इंटरनॅशनलच्या विमानात एका जोडप्याचा रोमान्स

Viral News: स्विस इंटरनॅशनलच्या विमानातून एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण क्रू मेंबर्सना नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या जोडप्याचे खासगी क्षण त्यांच्या परवानगीशिवाय कॅमेऱ्यात कैद केल्याचा आणि नंतर त्यांच्या परवानगीशिवाय ते ऑनलाइन लीक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ट्रॅव्हल ब्लॉग वन माईलनुसार, ही संपूर्ण घटना स्विस एअरलाइन्सच्या विमानात घडली. एलएक्स १८१ हे विमान बँकॉक ते झुरिच १२ तासांचा प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान एक जोडप सेक्स करताना कॅमेऱ्यात कैद झाले. कॉकपिटच्या दरवाजाजवळ हा सगळा प्रकार घडत होता. त्यामुळे कॉकपिटच्या दरवाजाच्या आत लाईव्ह कॅमेऱ्याच्या साहाय्याने ते आतील वैमानिक आणि क्रू मेंबर्सलाही पाहता येत होते.

हा कॅमेरा कॉकपिटच्या दरवाजावर लावण्यात आला आहे जेणेकरून पायलटला गेट कधी उघडणे सुरक्षित आहे आणि केव्हा नाही हे कळेल. हा एक प्रकारचा सिक्युरिटी कॅमेरा आहे. मात्र, या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोणतेही रेकॉर्डिंग करता येणार नाही. यामाध्यमातून केवळ लाइव्ह फीड पाहता येत होती. पण या घटनेदरम्यान कॉकपिटमध्ये बसलेल्या लोकांनी ते नुसते पाहिले नाही तर दुसऱ्या डिव्हाइसद्वारे रेकॉर्डही केले. मात्र, हे रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती पायलट होती की, क्रूमधील अन्य कोणी सदस्य हे अद्याप समजू शकलेले नाही. रेकॉर्डिंगनंतर संपूर्ण फुटेज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले.

एअरलाइन्सचे प्रवक्ते फुहलरॉट यांनी सांगितले की, लोकांच्या संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करणे किंवा रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणे आमच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. हे आमच्या नियमांचे उल्लंघन करते. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर विमानातील प्रायव्हसीबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्विस एअरलाइन्सने या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.

भारतात कायदा काय सांगतो?

संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ काढणे, प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे हा आयटी कायद्याच्या कलम ६६ (अ) अन्वये गंभीर गुन्हा मानला जातो. अशा गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती कोणत्याही महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असेल तर आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत कारवाई केली जाते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर