Viral Video: ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: ओव्हरटाईम करू नको, घरी जा; रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

Nov 21, 2024 06:28 PM IST

Chinese Robot Viral Video: रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे बोलले जात आहे.

रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल
रोबो एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करताना आपल्या सहकाऱ्यांसोबत चाय, कॉफी किंवा नाष्टा करण्याजाठी जातात, जी एक साधारण गोष्ट आहे. मात्र, रोबो असे करू लागले तर, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. पंरतु, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आता काहीच अशक्य नाही, असे वाटू लागले आहे.  नुकताच चीनमधील एका रोबोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो दुसऱ्या रोबो ओव्हरटाईम करण्याऐवजी घरी जाण्याचा सल्ला देत आहे.

चीनमधील शांघाय शहरातील एका रोबोटिक्स शोरूम एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये एक लहान रोबो इतर १२ रोबो काम करताना पाहून त्यांना म्हणतो की, तुम्हाला सुट्टी मिळत नाही का, तुम्हाला घरी जायचे नाही का? यावर एक रोबो त्यांना घर नसल्याचे सांगतो.  त्यानंतर हा लहान रोबो सहानुभूती दाखवून त्यांना माझ्याबरोबर माझ्या घरी या, असे बोलतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  या संपूर्ण संभाषणानंतर लहान रोबो पुढे चालतो आणि इतर सर्व रोबो त्याच्या मागे जातात. मात्र, त्यानंतर ते कुठे जातात? याचे कोणतेही फुटेज दाखवले जात नाही. तेथून रोबो निघाल्यानंतर थोड्याच वेळात काही लोक तिथे येतात आणि इकडे तिकडे रोबोट शोधू लागतात.

 

गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, हे रोबो वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केले होते. एरबाई असे या लहान रोबोचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही रोबो बनवणाऱ्या कंपन्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. तो पूर्णपणे खरा आहे. रोबोमधील संपूर्ण संभाषण आणि हालचाली हा एका प्रयोगाचा भाग असल्याचे कंपन्यांनी म्हटले. लहान रोबोट बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, आम्ही असा प्रयोग करू शकतो का? हे पाहण्यासाठी आम्ही समोरच्या कंपनीकडे आधीच परवानगी मागितली होती. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही आमचा रोबो त्यांच्या कारखान्यात पाठवला, जिथे आमचा रोबो या प्रयोगात यशस्वी झाला.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला अनेक जण फेक म्हणत आहेत, तर अनेक जण याला आश्चर्यचकीत असल्याचे म्हणत आहेत. यावर एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की, असे कसे होऊ शकते, अर्थात हे फेमस होण्यासाठी बनवले जाते. तर, आणखी एका युजरने प्रतिक्रिया देत हे भीतीदायक असल्याचे म्हटले आहे. एक दिवस जर त्यांनी माणसाला आपला शत्रू मानायला सुरुवात केली तर मानवी संस्कृतीलाच धोका निर्माण होईल.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर