Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. यातील काही व्हिडिओ गंमतीशीर असतात. तर, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारी ठरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक चिमुकली स्वतःच्याच सावलीला घाबरून पळत सुटते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हासू आवरणार नाही. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक चिमुकली पहिल्यांदाच स्वत:ची सावली बघते. त्यावेळी कोणतरी तिचा पाठलाग करत असल्याचे तिला वाटते आणि स्वत:च्याच सावलीला घाबरून पळत सुटते. व्हिडीओत शेवटी तुम्हाला दिसेल की अखेर भीतीपोटी ती खाली पडताना दिसते. यावेळी तिचे पालक फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे.
Hood Clippy या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच लहान मुलांचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे अनेकांना आवडते.