Viral News: विमानातील रिक्लिनर सीट एका तरुणीसाठी डोकेदुखी ठरली. या तरुणीला जवळपास १५ तास तिच्या सीटच्या मागे बसलेल्या वृद्ध दाम्पत्याचा छळ तिला सहन करावा लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये संबंधित तरुणीच्या मागे बसलेली वृद्ध महिलेने तरुणीला हाताने अश्लील हावभाव करताना दिसत आहे.
काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, वृद्ध महिला समोर बसलेल्या तरुणीच्या सीटला लाथ मारत आहे. तसेच हाताने पुढे ढकलताना दिसत आहे. तरुणी हा संपूर्ण प्रकार तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी एअरलाइनवर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर एअरलाइन्सने या प्रकरणी चौकशी करत वृद्ध दाम्पत्यावर आपल्या विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कॅथे पॅसिफिक एअरलाइनचे आहे. फ्लाइट हाँगकाँगहून लंडनला जात होती. तरुणीने आपली रिक्लिनर सीट मागे ढकलून आराम करण्यास सुरुवात केली. परंतु, तरुणीच्या सीटच्या मागे बसलेले वृद्ध महिलेने तिला टीव्ही स्क्रीन दिसत नसल्याचे सांगितले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. व्हायरल व्हिडिओत असे दिसत आहे की, वृद्ध महिला संबंधित तरुणीला त्रास देत आहे. सुरुवातीला वृद्ध महिलेने स्वत:च्या हाताने तरुणीच्या सीट पुढे ढकलले. नंतर सीटला लाथाने मारले. याबाबत तरुणीने जाब विचारला असता वृद्ध महिलेने तरुणीला अश्लील हावभाव केले. तरुणीने वृद्ध महिलेच्या वर्तनाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी लाइक्स केले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी वृद्ध दाम्पत्याकडे बोट दाखवत 'किमान वयाचे तरी भान ठेवा', अशी कमेंट केली आहे.