Viral News: गाडी चालवताना लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी दंड ठोठावल्याचा प्रकार समोर आला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अशा बेदरकार वागणुकीबद्दल कडक इशारा देखील दिला आहे. हा प्रकार नेमका कधी घडला? याबाबात कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्ना प्रतिक्रिया येत आहेत.
बेंगळुरूच्या ट्रॅफिक नॉर्थचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात महिला रस्त्यावरून जाताना स्टिअरिंग व्हीलवर आपला लॅपटॉप ठेऊन काम करताना दिसत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महिलेला दंड ठोठावण्यात आल्याचा फोटोही पोलिसांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ड्रायव्हिंग करताना कारमधून नव्हेतर घरून काम करा, असे लिहिले आहे.
या व्हिडिओला १२०.९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली. या व्हिडिओला २ हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, जीव धोक्यात घालणाऱ्या मूर्ख महिलेविरोधात कारवाई केल्याबद्दल धन्यवाद. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, पण या महिलेचा चेहरा धुसर का ठेवला आहे. तिसऱ्या व्यक्तीने नेमका दोष कुणाचा आहे, कर्मचारी की मालकाचा? असे विचारले आहे. चौथ्या व्यक्तीने म्हटले आहे की, या महिलेचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करावे. पाचव्या व्यक्तीने म्हटले आहे की, रस्त्यात जागोजागी खड्डे खोदून ठेवल्याने लोकांना नियोजित वेळेत कामावर पोहोचण्यात उशीर होतो. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'प्रशासनाने ही महिला जिथे काम करते, ज्या कंपनीचे नाव जाहीर केले पाहिजे. म्हणजेच लोक त्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणार नाहीत. एवढेच नव्हेतर कंपनीचे सीईओ आणि मॅनेजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे.'
संबंधित बातम्या