Viral Video: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद-viral video bengaluru man molests woman out for morning walk cctv footage surfaces ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Aug 06, 2024 01:19 PM IST

Bengaluru Woman Assaulted on Morning Walk: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत तरुणाचे लज्जास्पद कृत्य

Bengaluru Woman Morning CCTV Footage: मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. व्हिडिओत आरोपी पीडित महिलेचा पाठलाग करून तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. मात्र, महिलेने आरडाओरडा केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दक्षिण बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात आहे. बंगळुरूच्या कोनानकुंटे भागात ३० वर्षीय महिला पहाटे पाच वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडते. घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या शेजाऱ्याची वाटत पाहते. तितक्यात एक तरुण तिच्या पाठीमागून येतो आणि तिचा विनयभंग करू लागतो. व्हिडिओत दिसत आहे की, महिला पुढे धावत असून तरुण तिचा पाठलाग करत आहे. त्याने महिलेशी केलेले गैरवर्तन सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाले आहे. मात्र, महिलेने हिंमत दाखवून जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. यामुळे तो घाबरला आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित महिला राजस्थानची रहिवासी असून ती दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे की, हे प्रकरण २ ऑगस्ट २०२४ या दिवशी घडले. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भिती निर्माण झाली. या घटनेनंतर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आम्ही सतर्क आहोत, अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असे अश्वासन दिले आहे. अशा भागांत गस्त वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबई: चालत्या रिक्षात महिलेचा विनयभंग

मुंबईतील बोरिवली परिसरात काही दिवसांपूर्वी चालत्या रिक्षात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला.पण मदत न मिळाल्यामुळे तिने रिक्षातून उडी घेतली. या घटनेत पिडीत तरुणीही किरकोळ जखमी झाली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपींमध्ये प्रवाशासह रिक्षाचालकालाही अटक केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग