मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral video : अ‍ॅमेझॉनवर ऑनलाइन मागवलेल्या पार्सलमधून निघाला किंग कोब्रा, व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

viral video : अ‍ॅमेझॉनवर ऑनलाइन मागवलेल्या पार्सलमधून निघाला किंग कोब्रा, व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Jun 19, 2024 11:11 AM IST

Cobra In Amazon Package: बंगळुरू येथील एका दाम्पत्याने दावा केला आहे की, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अ‍ॅमेझॉनच्या पॅकेजमध्ये विषारी किंग कोब्रा आढळून आला. दाम्पत्याने हा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करून कंपनीकडे तक्रार केली.

अ‍ॅमेझॉनच्या पॅकेजमध्ये ग्राहकांना किंग कोब्रा आढळला आहे.
अ‍ॅमेझॉनच्या पॅकेजमध्ये ग्राहकांना किंग कोब्रा आढळला आहे. (X/ANI)

Kong Cobra Viral Video: बंगळुरूमधील एका जोडप्याने ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता, पण पॅकेज मिळाल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दाम्पत्याने पार्सल उघडताच त्यांना बॉक्समध्ये चक्क किंग कोब्रा दिसला. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या बॉक्समध्ये किंग कोब्राला पाहून दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कसा तरी बॉक्स बंद केला आणि कंपनीकडे तक्रार केली. या प्रकरणाची माहिती मिळताच कंपनीतील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. कंपनीने तक्रारीला उत्तरही दिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील सर्जापूर रोडवर राहणाऱ्या संबंधित व्यक्तीने सांगितले की, त्याने ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून एक्सबॉक्स कंट्रोलरची ऑर्डर दिली. पण जेव्हा ऑर्डर बॉक्स आला आणि त्याने तो उघडायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या आतून एक कोब्रा साप बाहेर आला. हे पाहून त्याची पत्नी घाबरली. महत्त्वाचे म्हणजे, हा साप पॅकेजिंग टेपला चिकटल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. कसातरी त्यांनी बॉक्स पुन्हा बंद केला.

ट्रेंडिंग न्यूज

अ‍ॅमेझॉनकडून खेद व्यक्त

पीडित दाम्पत्याने सांगितले की, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण तपशीलांसह व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओसह लेखी तक्रारही कंपनीच्या अधिकाऱ्याला ईमेलद्वारे करण्यात आली. यानंतर कंपनीने त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. कंपनीने लिहिले की, अ‍ॅमेझॉनकडून मिळालेल्या ऑर्डरबद्दल तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल जाणून घेतल्याबद्दल खेद वाटतो. कंपनी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, लवकरच कंपनीची एक टीम तुमच्याशी अपडेट्स घेऊन संपर्क करेल. परंतु, या जोडप्याचे म्हणणे आहे की, आतापर्यंत कंपनीच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. कोब्रा सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले असले तरी कंपनीचा दृष्टिकोन समाधानकारक नाही.

नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

याप्रकरणी अ‍ॅमेझॉन चौकशी करणार आहे. चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अ‍ॅमेझॉनवरून वस्तू ऑर्डर करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. तर, काही लोकांनी अ‍ॅमेझॉनला ग्राहकांच्या जीवाची पर्वा नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला. 

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर