मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: बांगड्या विकणारी महिला बोलतेय फाडफाड इंग्रजी; ऐकून नेटकरी अवाक!

Viral Video: बांगड्या विकणारी महिला बोलतेय फाडफाड इंग्रजी; ऐकून नेटकरी अवाक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2024 04:18 PM IST

Bangle Seller Viral Video: बांगड्या विकणाऱ्या महिलेचा इंग्रजी बोलतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

Viral Video
Viral Video

Bangle Seller Women Speaks Fluent English: भारतातील पर्यटन स्थळावर नेहमीच परदेशातून लोक फिरायला येतात. भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांशी स्थानिक लोक त्यांच्या भाषेत संवाद साधतात, हे अनेकांना माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा इंग्रजी बोलतानाचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या महिलेचे इग्रंजी इतके चांगले आहे की, एखाद्या सुशिक्षित व्यक्तीलाही असे इंग्रजी बोलता येणार नाही. हा व्हायरल व्हिडिओ गोव्यातील वॅगेटोर बीच येथील असल्याचे बोलले जात आहे.

der_alpha_mannchen या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ज्यात बांगड्या विकणारी महिला चक्क इंग्रजी भाषेत विदेशी पर्यटकाला समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या परिस्थितीबद्दल सांगत आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणते की, "हा समुद्रकिनारा खूप छान आहे. अगोदर फक्त विदेशी नागरिक या समुद्र किनाऱ्यावर यायचे. मात्र, कोरोनानंतर भारतीय लोक देखील या समुद्रकिनाऱ्यावर येतात. वॅगेटोर बीच काळ्या खडकांसाठी ओळखला जातो. गोव्याच्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांमध्ये हा बीच लोकप्रिय आहे."

या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांगड्या विकणारी महिला इतके चांगले इंग्रजी बोलू शकते, यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही. या व्हिडिओ अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बांगड्या विकणाऱ्या महिलेचे इंग्रजी ऐकून नेटकरी अवाक झाले. महिलेचे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

WhatsApp channel

विभाग