Viral News: भारतीय रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी किती मेहनत घेतात, हे सर्वांनाच माहिती आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात लोको पायलट स्वत:चा जीव धोक्यात घालून बंद पडलेली ट्रेन चालू करण्याचा प्रयत्न करत आहे. लोको पायलटच्या अशा कामगिरीचे खूप कौतूक होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आसाम येथील असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी लोको पायलट आर.के. रंजन आणि सहाय्यक लोको पायलट रामजी कुमार एनएफआर झोनमध्ये १५६५७ अप ब्रह्मपुत्रा मेल घेऊन जात होते. परंतु, बिजनी ते पाटीलदाह दरम्यान पुल क्रमांक ४५६ वर अचानक ट्रेन थांबली. त्यानंतर असिस्टंट लोको पायलट आर. कुमार यांनी आपला जीव धोक्यात घालून उंच पुलावर बंद पडलेली ट्रेन चालू केली. यामुळे प्रवशांना वेळेत आपल्या इच्छित स्थळी पोहोचता आले.
पुलावर ट्रेन अचानक थांबल्यानंतर असिस्टंट लोको पायलट रामजी कुमार टेनमधून खाली उतरले आणि एका लोखंडी रॉडच्या मदतीने ट्रेन सुरू केली. त्यानंतर ते पुन्हा ट्रेनमध्ये चढले आणि त्यानंतर ट्रेन सुरू झाली. लोको पायलटच्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स लोको पायलटचे खूप कौतुक करत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, अशा लोकांमुळेच देशात रेल्वे सेवा मिळत आहे, नाहीतर लोको पायलटने ट्रेन चालू करण्यासाठी स्वत: जीव धोक्यात घालण्याची काय गरज होती? एकाने लिहिले की, भावाला सलाम, हा व्हिडिओ पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना अभिमान वाटत आहे.
याआधी बिहारमध्येही अशीच घटना घडली होती, गोरखपूरहून नरकटियागंजला जाणारी ट्रेन क्रमांक ०५४९७ वाल्मिकीनगर आणि पानियाहवा दरम्यानच्या पुलावर थांबली होती. अजय यादव आणि रणजीत कुमार यांनी जीव धोक्यात घालून ट्रेन सुरू केली होती. यूएल व्हॉल्व्हमधून गळती झाली होती, यामुळे ट्रेन बंद पडली होती, असे सांगण्यात आले.
बंगळुरुच्या ट्रॅफिकमध्ये ट्रेन अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आऊटर रिंग रोडजवळील मुन्नेकोला रेल्वे फाटकावर अनेक वाहने रेल्वे रुळावर पोहोचली. त्यामुळे लेव्हल क्रॉसिंग खाली आणता न आल्याने सर्व वाहने रेल्वे रुळावर अडकली. गाड्या सुटेपर्यंत ट्रेन थांबवावी लागली. ट्रॅकवर वाहने उभी असल्याने लेव्हल क्रॉसिंग खाली करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. गाड्या निघेपर्यंत ट्रेन तिथेच उभी होती.