मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: धावत्या बसमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, खिडकीची काच लावण्यावरून पेटला वाद!

Viral Video: धावत्या बसमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, खिडकीची काच लावण्यावरून पेटला वाद!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 09, 2024 01:59 PM IST

Bengaluru Women fighting video: हा व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Viral Video
Viral Video

Bus Viral Video: बेंगळुरूमध्ये बीएमटीसी बसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात दोन महिलांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. खिडकीची काच लावण्यावरून या महिलांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, त्यानंतर वाद आणखी पेटल्याने दोघी एकमेकींना मारहाण करू लागल्या. अखेर बस कंडक्टरच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.

@gharkekalesh या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आपण पाहू शकतो की, बसच्या पुढे असलेल्या सीटच्या तिथे दोन महिला चक्क एकमेंकीना मारत आहे. अनेक प्रवासी फक्त महिलाची हाणामारी पाहत आहेत.या महिला एकमेंकीना चप्पलने हाणत आहेत. या बसमध्ये आपल्याला अनेक प्रवासी दिसून येत आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसच्या खिडकीची काच लावण्यावरून दोन्ही महिलांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, असे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने अजून जोरात असे या व्हिडिओला कमेंट केली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले.

WhatsApp channel

विभाग