Viral News: अल्पवयीन मुलांसोबत अश्लील आणि असभ्य कृत्य केल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनेकांनी महिलेचे हे कृत्य पाहिले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. यासंबंधीत एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलीस महिलेला अटक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील आहे. ओक्लाहोमा येथील स्विमिंग पूलमध्ये अनेक १२ ते १३ वयोगटातील मुले अंघोळ करत होती. या मुलांसोबत एक महिला देखील होती. या महिलेचे वय २८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेवर अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हेतर, एका मुलाने आरोप केला आहे की ती महिला त्याला तिचा प्रियकर बनण्यास सांगत होती.
महिलेने अयोग्यरित्य स्पर्श करण्यास सुरू केल्यानंतर मुलांनी पोलिसांना फोन करून महिलेची तक्रार केली. ही महिला अनेक दिवसांपासून त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचे मुलांनी सांगितले. तिने स्विमिंग पूलमधील मुलांचे कपडे काढण्याचाही प्रयत्न केला. ती मुलांना 'डॅडी' म्हणायची. यामुळे काही मुले अस्वस्थ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
स्विमिंग पूलच्या जीवरक्षकांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्या महिलेला मुलांसोबत गैरवर्तन करताना पाहिले. त्यानंतर महिलेला स्विमिंग पूलमधून बाहेर पडण्यास सांगितले आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालतात हजर केले.
महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, ती पाण्यात बुडू लागल्याने तिने स्वत:ला वाचवण्यासाठी तिने मुलांना पकडले.तिचा कोणताही वाईट हेतू नव्हता. महिलेला कोर्टातून जामीन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला अनेक दिवसांपासून लहान मुलांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे साक्षीदार आणि पीडित महिलांच्या जबाबावरून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या