Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये देसी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सोशल मीडियावर सध्या लहान बाळाचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एका आईने बाळाला झोपवण्यासाठी युनिक टेक्निक वापरली आहे, ज्यामुळे बाळ अवघ्या १० सेकंदात झोपी गेले.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान बाळ झोपत नाही. त्याला झोपवण्यासाठी त्याची आई अनेक प्रयत्न करते. त्यानंतर आई बाळाला झोपवण्यासाठी युनिक टेक्निक शोधून काढते. ज्यामुळे तिचे बाळ अवघ्या १० सेकंदात झोपते. बाळाला झोपवण्यासाठी आई वॉशिंग मशीन सुरू करते. त्यानंतर बाळाला मशीनच्या समोर स्ट्रोलरमध्ये ठेवते.वॉशिंग मशीन सुरू झाल्यानंतर बाळ लगेच झोपते.
@TheFigen_ नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ ८५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर, काही जण महिलेच्या युनिक टेक्निकचे कौतूक करताना दिसत आहे.