80 year old Women Workout Video: सध्या सोशल मीडियावर एका ८० वर्षाच्या महिलेची वेगळीच चर्चा रंगली आहे. या महिलेचा जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. बहुतेक लोक वयाच्या ३० नंतर व्यायामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पण या महिलेचा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.
फिटनेस कोच लॉरा सोमर्स यांनी तिच्या व्यायामाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोमर्स यांनी लिहिले आहे की, "इलेनला पाहून मी खरोखरच थक्क झालो. ती ८० वर्षांची आणि अजूनही फीट आहे. मी तिच्याशी जिममध्ये बोललो, कारण तिला जीममध्ये वर्कआऊट करताना मी पाहिले. तिची ही गोष्ट लोकांसमोर मांडायची होती.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एक वापरकर्ता लिहिले आहे की, "उत्तम काम, तुम्ही इतर अनेकांसाठी आदर्श आहात." दुसर्या यूजरने लिहिले की, "खरोखर तुमची मेहनत लोकांसाठी प्रेरणापेक्षा कमी नाही." या व्हिडिओला जवळपास एक लाख लोकांनी लाख केले आहे. तर, पाच लोकांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.