मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dogs vs Snake Viral Video: घरात शिरलेल्या किंग कोब्राला कुत्र्यांनी घेरलं, पुढं काय घडलं? बघा

Dogs vs Snake Viral Video: घरात शिरलेल्या किंग कोब्राला कुत्र्यांनी घेरलं, पुढं काय घडलं? बघा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 07, 2024 12:51 PM IST

Dogs and Snake Fights Video: साप आणि कुत्र्यांच्या लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Dogs vs Snake Viral Video
Dogs vs Snake Viral Video

Animal Viral Video: साप प्रचंड विषारी प्राणी आहे. सापाचं विष माणसांसहित प्राण्यांनाही माणसांनाही अत्यंत घातक आहे. यामुळे प्राणी किंवा माणसं विषारी सापापासून दूरच राहतात. सापांवर प्रेम करणारे क्वचित माणसं आढळून येतील. मुंगूस प्राणी सोडला तर कोणत्याही प्राण्याची सापासोबत क्वचित झुंज पाहिली असेल. पंरतु, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ३ कुत्रे चक्क सापाशी लढताना दिसत आहे. कुत्र्याचा आणि सापाच्या लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये गावातील एका घराबाहेर कुत्र्यांना साप दिसतो. त्यानंतर कुत्रे सापाच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. तसेच जोरजोरात भुंकताना दिसत आहेत. गावातील एका व्यक्तीने हा क्षण त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

Viral Video: तरुणाचा जीवघेणा स्टंट; धावत्या बाईकवर झोपून खेळतोय मोबाईलमध्ये गेम, पाहून नेटकरी शॉक!

या व्हिडिओतील साप किंग कोब्रा असल्याचे बोलले जात आहे. कुत्र्यांना साप दिसल्यानंतर त्यांनी भुंकायला सुरुवात केली आणि नागरिकांना धोक्याची जाणीव करून दिली. व्हिडिओमध्ये एक महिलाही दिसत आहे. सापाच्या भीतीने महिला रस्त्याच्या कोपऱ्यात उभी असल्याचे दिसत आहे.

WhatsApp channel

विभाग