Viral video : जत्रेच्या वेळी १०० फूट उंच भलामोठा रथ कोसळला; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral video : जत्रेच्या वेळी १०० फूट उंच भलामोठा रथ कोसळला; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Viral video : जत्रेच्या वेळी १०० फूट उंच भलामोठा रथ कोसळला; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Apr 07, 2024 08:44 PM IST

Temple Chariot Collapses : बेंगळुरूजवळच्या हुस्कुर मदुरम्मा मंदिराच्या जत्रेवेळी १२० फूट उंचीचा भलामोठा रथ कोसळला. वार्षिक यात्रेनिमित्त हा रथ बाहेर काढला जातो. शनिवारी गर्दीच्या वेळी अचानक कोसळला.

जत्रेच्या वेळी १०० फूट उंच भलामोठा रथ कोसळला
जत्रेच्या वेळी १०० फूट उंच भलामोठा रथ कोसळला

एका धार्मिक कार्यक्रमावेळी १०० फुटांहून अधिक उंचीची भलामोठा रथ (Temple Chariot Collapses) भाविकांवर कोसळला. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला व कोणालाही दुखापत झाली नाही. कर्नाटकमधील बेंगळुरू जवळच्या एका गावात ही घटना घडली. वार्षिक जत्रेच्या वेळी धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना टळली.

बेंगळुरूजवळच्या हुस्कुर मदुरम्मा मंदिराच्या जत्रेवेळी ही दुर्घटना घडली. या यात्रेनिमित्त बाहेर काढलेला १२० फूट अधिक उंचीचा रथ ७ एप्रिल रोजी गर्दीच्या वेळी अचानक कोसळला. यावेळी रथाच्या भोवती भाविकांची मोठी गर्दी होती. रथ कोसळल्यानंतर लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी तसेच दुखापत झाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बंगळुरूजवळच्या हसकुर मदुरम्मा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी जत्रा भरवली जाते. या यात्रेत रथोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणेयंदाही रथोत्सवाचे आयोजन केले गेले. यानिमित्त १०० फुटांपेक्षा जास्त उंचीचा एक रथ तयार करण्यात आला होता. फुलांनी सजवलेला हा रथ ४ बैलगाड्या आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुढे खेचला जात होता. रथ पुढे ओढताना या रथाभोवती शेकडो भाविक जमले होते. रथ पुढे खेचताना रथ एका बाजूला झुकला व जमिनीवर कोसळला.

रथ कोसळत असल्याचे पाहून भाविक घाबरले व इकडे-तिकडे पळू लागले. रथ जमिनीवर कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते.सुदैवाने चेंगराचेंगरीची घटना घडली नाही.

NCERT ने अभ्यासक्रमात आता पुस्तकात राम मंदिर उभारणीचा धडा -

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने अभ्यास क्रमात काही बदल केले आहेत. इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून बाबरी मशीद, हिंदुत्वाचे राजकारण, २००२ गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकां संदर्भात असलेले काही प्रकरणे काढून टाकली आहेत. नव्या सत्रापासून बदललेला अभ्यासक्रम लागू होणार आहे. अलीकडच्या काळात एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच अभ्यासक्रमातील संवेदनशील विषय देखील काढून टाकण्यात आले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर